जीवन गाणे. गातच राहणे.
वाट पाहायची, पण शांत रहायचं,
क्षण येतील जातील, पण त्या आठवणी राहतील.
त्या बोलतील मनाला, तेव्हा हेच शब्द सांगतील
जीवन आहे हे..
त्यात हसायच-रडायच,
दिवसातून एकदा बेलगाम उडायच
मनसोक्त खेळायच आणि मस्त जगायच,
आलेल्या प्रसंगात मिसळत, तो जिंकायचा.
मोठ्या आवाजात ओरडून सांगायच ,
जीवन आहे हे...
बिनधास्त जोरात डि जे लावून, मोकळे नाचायचे,
कधी एकट्याने मनाला बोलणारे गाणे वाजवायचे,
हळूच आपल्यातल्या आपल्याला बोलायचं
आणि सांगायचे,
जीवन आहे हे....
असच कधी काही आवडले तर पेन घ्यायची
आणि त्याला शब्दात कायमच बंद करुन जपायच.
आणि त्याला नाव द्यायच, जीवन आहे हे.!!
त्याच स्वागत करायच आणि सतत पुढेच चालायच.।।
Mast Patil
ReplyDeleteBhari
ReplyDelete