शिवजयंती - २०१९.
"शिवजयंती आणि परमनंट चे विचार."
शिवबा, शिवाजी, शिवराय, शिवाजी महाराज, राजे, छत्रपति, जाणता राजा अशी कितीतरी नावे एका मानवाने एका आयुष्यात कमावलीत.
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे.??
कदाचित शेक्सपियर यांनी "शिवाजी" या नावाचा अभ्यास केला नसावा, म्हणून तो प्रश्न त्यांना असेल.
भारतात, महाराष्ट्रात आल्यानंतर कळतं कि, "शिवाजी" या नावाचे "चलन" काय आहे.??
काय काय कारनामे ह्या नावाच्या साहाय्याने होऊ शकतात हे कळते.
तसे शिवाजी महाराजांचे आपल्याला माहिती असलेले कार्ये खुप मोठे आहेत.
३५० वर्षापासून आपण फक्त मोजक्याच कामाचा उदो उदो करतो आणि महात्म्य गातो, मोजकेच पराक्रम गात बसतो.
शिवाजी महाराजांचा एक फतवा (कायदा/आदेश) होता..
"सर्वांस पोटास लावणे आहे. "
हे तसे चार शब्द पण अर्थ आणि काम अजूनही चालूच आहे.
ययातून शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्यकारभार, काळजी, जिम्मेदारी हे सर्व दृष्टीकोन आपल्या लक्षात येतात.
त्या कायद्यातून शिवरायांना अभिप्रेत होते,..
"सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, काम, सुरक्षा आणि शांति."
हा कायदा, हे विचार शिवरायानंतर च्या राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊच दिला नाही. ज्यांनी त्यांनी "शिवाजी" या नावाचा वापर कसा केला जाऊ शकतो याचाच विचार केला म्हणून त्यांच्यानंतर किंवा त्यांच्याआधीच्या राजाला जनतेने इतका उचलून घेतला जात नाही.
आजही महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित शिवशाही आलीच नाही. कारण शिवराय ना राज्यकर्त्यांना समजले ना जनतेला..
कोणी,
शिवाजी हे नाव - शस्त्र म्हणून वापर करतो.
शिवाजी हे नाव - धंधा चालवण्यासाठी.
शिवाजी हे नाव - भडकूण देण्यासाठी, तेढ निर्माण करण्यासाठी.
शिवाजी हे नाव - सत्ता मिळवण्यासाठी.
शिवाजी हे नाव - भीती निर्माण करण्यासाठी.
शिवाजी हे नाव - द्वेष निर्माण करण्यासाठी.
शिवाजी हे नाव - सुरक्षा मिळवण्यासाठी.
शिवाजी हे नाव - पैसा कमावण्यासाठी.
शिवाजी हे नाव - संघटनेतून दबाव निर्माण करण्यासाठी.
शिवाजी हे नाव - राजकारणातून स्वार्थ साधण्यासाठी.
अशाच स्वार्थी हेतूसाठी वापर केला जातोय.. आणि तो स्वार्थ साधला देखील जातो. !यातून एकच लक्षात येते, शिवाजी नावात काय जादू आहे, चमत्कार आहेत, हे नाव म्हणजेज कामधेनू आणि परीस.
हे पाहून मग प्रश्न पडतो कित्येक राजे होऊन गेलेत पण शिवाजी नावाने का इतकी जादू होते.?? काम हॊतात..?? का.??
तर उत्तर भेटते त्यांच्या त्या फतव्यात. आज ३५० वर्षानंतर देखील त्यांच्या "सर्वांस पोटास लावणे आहे." हा कायदा किती काम करतो. जगाच्या इतिहासात नावाची जादू असणारा एकमेव राजा.
नुसत इतिहासात डोकावून पाहिले तरी जीवन सहज सोप होऊन जाते. तुम्ही काय घेता त्यांच्या कडुन ते तुमच्यावर..
आज व्याख्याते, लेखक, कवि, गायक, शाहिर, संघटक, दुकानदार, जयंतीवाले, पोश्टर डिजाइनर, कित्येक जन त्यांच्या नावा सोबत अजरामर होत आहेत( काही काळासाठी.) हे त्या 'सर्वांस पोटास लावणे आहे.' कायद्याचं यश.
पाहिजे तसे "शिवाजी महाराज" तुम्हाला भेटतील. ज्यांनी त्यांनी पाहिजे तसे शिवाजी महाराज फिरवले. कोणी हिंदू-मुस्लिमांत दंगल घडवण्यासाठी तर कोणी जोडण्यासाठी. कोणी जातीत शिवराय मर्यादित केले तर काहीजणांनी शिवराय सगळयांचे आहेत हे सांगितले.
३६०° डिग्री मध्ये फिरवता येणारे शिवराय हे एकमेव राजे. किती ही फ्लेक्जीबीलीटी..??
म्हणून दूसरे शिवराय होणे नाहीच.
ज्या राजांनी सर्वांच्या पोटाची काळजी केली त्याच राजांवर सर्वांत जास्त अन्याय केला जातो.
नावाचा वापर करुन दंगे भडकवायचे, जाती जातीत द्वेष निर्माण करायचा, इतिहास लिखाणातून आपल्याला हव्या त्या पद्धतीत सांगून स्वकमाई, स्वसुरक्षा करायची, वाहवा मिळवायची हेेेच चालू आहे.
सर्वजण एकत्रित येतील या दिशेने प्रयत्न करणे खुप गरजेचे आहेत.
आज शिवरायांच्या इतिहासात रमून जायला आपन धन्य मानतो, स्वतःचा मोठेपणा आणि नशीबवान समजत फिरतो. आजुन किती दिवस आपण त्या गोष्टीत रमुन जगायचं. तो टिकवायचा हे आपले कर्तव्यच. परंतु येणा-या पिढीला आपण काय देणार हे देखील महत्वाचे आहे. विचार झाला पाहिजे.
त्यांनी भावी पिढीचा विचार केला म्हणून आज आपन सुरक्षित आहोत, शिवराय जर राम, कृष्ण, महाराना प्रताप यांच्याच इतिहासात रममाण झाले असते तर..??
आपण, भविष्याचा विचार करत नाहीच, भावी पिढीला काय द्यायच हे नसतेच, किती जूणी गोष्ट देता येईल हेच पाहतो आपन. आणि धन्यता मानतो.
जगाचा विचार केला तर लक्षात येते विदेशातील लोकांनी निर्माण केलेल्या वस्तुंची मदत घेऊन आपन आपल्याच गोष्टी सांगण्यात मोठेपणा समजतो. दूस-यांच्या मदतीने आपन आपले मोठेपन गात असु तर, त्यात आपले काय.??
आजच्या दुनियेत आपले असे जगाला देणारे काय करु शकतो याचा विचार झाला पाहिजे..
हे आजचे मोबाईल, गाड्या, संगीत क्षेत्र, सुरक्षा क्षेत्र, चित्रपट, अश्या सर्वच क्षेत्रांत बाहेर देशातील लोकांचीच कामगिरी आहे. आपण फक्त कॉपीपेस्ट जमात होत आहोत. इतिहासात तल्लीन राहायचं, तीच नशा चढवाइची आणि इतिहासाचा आधार घेत आम्ही खुप महान आहोत या आवेशात जगायचं. ही आजच्या काळातली आपली मर्दानगी. आपण इतिहासातून शिकत काहीच नाही फक्त रवंथ करतो. पाहिजे तेंव्हा चघळतो. वाटेल तसे पाहिजे तिथे थुकतो. इतिहास पचतच नाही आपल्याला. इतिहासाची नशा निर्माण करण्यासाठीच आपल्या इकडे वापर केला जातो.
म्हणून त्या नशेत आपण गुलाम होतच आलोय, नंतर जेव्हा कळतं तेंव्हा बोंब मारायची, पुन्हा त्या गुलामीला काढुन देण्यासाठी इतिहास निर्माण करायचा त्यात जुना मिक्स करायचा आणि पुन्हा नशा... पुन्हा गुलाम, पुन्हा अन्याय, पुन्हा रडायच हेच चक्र. किती दिवस.?? स्वयंपूर्ण कधी होणार.??
शिवजयंती निमित्त एकच सांगाव वाटते की, इतिहासात तल्लीन होऊन किती दिवस चालणार.?? उद्याचा विचार करावाच लागणार आपल्याला !!
शिवरायांनी त्यावेळेस "सर्वांच्या पोटाची व्यवस्था केली."
आज आपण आपल्या परिवाराच्या पोटाची व्यवस्था करु शकत नसु. तर, खरचं शिवराय आपल्याला समजले आहेत का..?? हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
ज्याने त्यांने स्वतःच्या परिवाराला जरी सुखात, शांतीत, समाधानात ठेवले तरी खुप आहे. आणि ज्यांने हे केले त्यालाच शिवराय समजले. नंतरच्या काळात तेच लोक गाजले. अजरामर ठरलेत. हे लक्षात घ्या.
ती देखील समाज सेवाच आहे.
या शिवजयंती निमित्त आई-वडील-भाऊ-बहीण-काका-काकु-मुलगा-नातलग यांना समाधान वाटेल, आनंद मिळेल आपला अभिमान वाटेल असे काही कार्य करुन थोडेसे शिवराय आपल्यात घेऊ..
शिवरायांचा उपयोग कोणाही विरुद्ध द्वेष, तिरस्कार, विरोध, टिका करण्याकरिता करु नाही, आणि कोणी करत असेल तर त्याला सांगून बघायच, नाही ऐकले तर दुर्लक्ष करायच. आणि परिवार, कुटुंब यांना प्राधान्य द्यायचे..
कारण, शिवराय होणे खुप अवघड आहे.
शिवरायांचा एक गूण जरी आला तरी त्यांच्या जवळ जाणे सहज शक्य आहे.
# याच शब्द रुपी *शिवजयंतीच्या* शुभेच्छा.. ������
- योगेश अडकिणे.
Comments
Post a Comment