न संपनारी गोष्ट...


ती काल आली होती, मी गेलो होतो.
सांगायचं होत मी पण आलो आहे.
पण, बोलायचं नव्हते.
यात हरकत नाही,
दिसण्याची.. हसण्याची, बघण्याची आणि जगण्याची बरकत आहे.

म्हणून बोलो नाही, पण सांगितलच, कि..
"बंद केलेल्या त्या मनात,
आठवणींच्या सावलीत,
आशेचा किरण पुन्हा पुन्हा येतोच.
आणि चमकतोच अंधारलेल्या मनाच्या कोठडीत.
एकदम लख्ख दिसतो.

अडगळीत बंद करुन ठेवलेल्या मनाच्या भिंतीवर..
तो आशेचा किरण पुन्हा दार उघडून वाट करायला सांगत असतो.
पण,  हे नंतर समजत..
लख्ख प्रकाशमय खोली पेक्षा अंधारलेल्या खोलीत प्रकाशकिरणांच तेज आणि सौंदर्य जास्त आकर्षक, प्रफुल्लित, प्रसन्न असते.

देवाच्या अंधकारमय देव्हा-यात सुर्यकिरणांचा अभिषेक मन स्थिर आणि शांत करते.

अखंड सुर्यप्रकाशापेक्षा जास्त
सुर्यकिरण प्रत्येकाला हवेशे वाटतात.
उन्हात असलेल्या मनाला, सावली रुपी विसावा हवा असतो.
अंधारात आणि बंद केलेल्या खोलीला किरण हवा असतो.

तिथेच अंधारलेल्या खोलीत,
शांत एकांत ठिकाणी
अंधार आणि प्रकाशाच मिलन होते.
मन आणि डोके जाग्यावर येते. बोलने होते... डोळ्यातून.!!"

हा मेसेज माझ्या मनाने डोळ्यातून,
फॉरवर्ड केला.
चेह-यावरच्या चंद्रकोर रेखेने,
सीन करुन डिलीवर झाल्याची खात्री दिली.
त्यातच आमची offline चैटिंग झाली.
स्वप्नांत नसलेल्या क्षणांची
स्क्रीनशॉट आली. 
आठवणींच्या गैलरीत कायमची बंद झाली. 

ती अंधारकोठडी पुन्हा बंद केली,
त्यातून ही कविता आली.

बंद कायमची का.?? ते माहिती नाही.
भविष्यात त्याच किंवा दुस-या एखाद्या पाखराणे खोली उघडलीच तर,
त्यात पुन्हा प्रकाश आणि आशेचा किरण येणार!!
हा विश्वास आहे..
म्हणून ही अंधाराची आणि किरणांची न संपनारी गोष्ट आहे...

Comments

  1. Casino Lake Tahoe - MapYRO
    Casino Lake Tahoe, Stateline, NV. Map of Casino Lake Tahoe. 경기도 출장샵 Stateline, 평택 출장마사지 NV. United States. 동두천 출장샵 Distance 보령 출장샵 from Tahoe to 정읍 출장샵 The Stars Casino and Hotel.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार