डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!
डोंगरकड्याची ओळख - श्री. जटाशंकर.
जटाशंकर डोंगरकड्यात कधी आले..?? कोणी आणले..?? कसे आले..?? या सारखे बरेच प्रश्न मनात येतात, पण कोणाला विचारतच नाही आपन.. आणि उत्तर मिळत नाही, म्हणून जटाशंकर कळतच नाही.
महाशिवरात्रीची यात्रा कधी पासुन सुरु झाली..??
मंदीर कधी आणि कोणाच्या काळात बांधले.??
माहिती नाही. आपल्या पैकि खुप जनांना.
आजच्या इंटरनेट च्या काळात, मोबाईल आणि यूट्यूब च्या मदतीने एक विडियो आला आपल्या पर्यंत, तेव्हा कळाल आपल्याला कि आपला महादेव जटाशंकर किती मोठा आणि बाहेर काय ओळख आहे जटाशंकराची!!
तो विडियो पाहताना कळत..
एकमुखी शिवलिंग, संपूर्ण भारतात दोनच आहेत त्या पैकि आपले जटाशंकर देवस्थान.!!
जटाशंकराची ख्याती जगभर घेऊन जाण्यासाठी आपन गावक-यांनी कधी केली नाही, ना शासनाने, ना राजकारण्यांनी, ना गावातील पुढा-यांनी, ना सुशिक्षित लोकांनी, ना व्यावसायिकांनी.. आपल्या पैकि सगळ्यांनाच जटाशंकराचे आशीर्वाद मिळत आलेत,
पुर्वजांनी निर्माण केलेले हे श्रद्धास्थान फक्त टिकून ठेवण्याचे काम करत आलोत. पण त्या स्थळाचा विकास, प्रसिद्धी, काळजी यांच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आलोत.
आणि स्वतःच्या मोठेपनात मग्न होत गेलो.
पण, सार्वजनिक रित्या जटाशंकर मंदिर, त्याचा इतिहास, संवर्धन व विस्तार यांच्यासाठी म्हणावे असे अजुन आजपर्यंत प्रयत्न कोणीच केले नाहीत.
गावक-यांनी, भक्तांनी, राजकारण्यांनी, शासनाने आणि गाव पुढा-यांनी आश्वासन व मोठेपणा या व्यतिरिक्त कोणतेच लक्षात राहण्यासारख कोणतीच काम केलेच नाही.
आपला आणि जटाशंकराच संबंध फक्त..
महाशिवरात्री, श्रावण महिना, व इतर सन व लग्न सोहळे या निमित्ताने मंदिरात जायच आणि जटाशंकराला तोंड दाखवून यायच इतकाच.
आणि काही गाव संकट आले, दुष्काळ, गारपिट, पूर, रोगराई अस काही झाले तर होम, हवन, पुजा, अश्या गोष्टी करुन थोड़ी विनवणी करायची आणि चांगले दिवस आले कि विसरायच हेच सुरु आहे. त्याच्या विकासासाठी, प्रसिद्धी साठी, काहीच करायच नाही.
डोंगरकडा गाव तस सधन, श्रीमंत, बागायतदार.. मोठे मोठे लग्न करणारे आणि हूंडा देण्यात स्पर्धा करणारे गांव म्हणून सगळीकडे ओळख आहे.
पण ही सगळी ओळख ज्याच्या आशीर्वाद आणि क्रपेमुळे आहे तो आमचा देव जटाशंकर गावाच्या बाहेर.. मसनवट्याची काळजी करत एकटाच लांब राहतो. त्याच आजपर्यंत आम्हाला काही वाटलच नाही..
जत्रा आली की मग आमची श्रद्धा दाखवण्याची स्पर्धा, बैनर लावून, गजाळ्या फिरवत, सुरु होते.
अस्वच्छता ते आम्हाला काहीच कळत नाही.
फक्त मोठेपणा आणि फोटोगिरी एवढाच कार्यक्रम सुरु होतो आमचा!!
( कोणत्या तरी नेत्याचा जटाशंकरा पेक्षा मोठा फोटो टाकायचा आणि नेत्या बद्दल श्रद्धा दाखवण्यासाठी मर मर सुरु असते. जत्रत येणारे लोकं जटाशंकरासाठी येतात ना कि तुम्हाला आणि तुमच्या नेत्याला बघायला.)
*जमल तर बघा जत्रतली बैनर गिरी बंद करुन, पैसा वाचवून जटाशंकरासाठी.. मंदिरासाठी.. डोंगरकड्यासाठी काही करता येत का..??*
जरा आजु बाजुच्या मंदिरांचा, देवस्थानाचा, गावाचा विचार करुन आपल्याला का वाटत नाही.. आपले जटाशंकर देवस्थान देखील विकसित आणि जगभर प्रसिद्ध झाले पाहिजे..??
बघा हे खालचे देवस्थान..
१) भवानी मंदिर, वारंगा फाटा.
२) देवकामाता मंदिर, हिवरा.
३) केदारगुडा.
४) पिंपळगाव महादेव मंदिर.
५) महादेव मंदिर, चैतन्य नगर, नांदेड.
६) काळेश्वर मंदिर, विष्णूपुरी.
७) सत्य गणपति.
अशी कित्येक देवस्थाने आहेत जी जटाशंकर मंदिरानंतर अस्तित्वात आली आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित झाली आणि प्रसिद्ध झाले. आणि आपले जटाशंकर मंदिर.. आपले गाव.. कुठे आहे.??
नियमित पुजा.. मंदिर विकास.. पर्यटन स्थळ या गोष्टींचा विचार करण्यासाठी आणि क्रतिशील कार्यक्रम आखण्यासाठी..
राजकारण, वाद, तंटे, हेवेदावे, भांडण, मोठेपणा, पुढारी पणा, फेसबुकपणा, फोटोशाही हे सगळ घरात ठेवून एकत्र यायलाच पाहिजे जटाशंकर देवस्थान विकासासाठी.. आपली ओळख टिकविण्यासाठी.
जसे मराठा क्रांती मोर्चा साठी आपण एक झालो होतो.. तशीच जटाशंकराची ओळख टिकविण्यासाठी एक व्हायचं आहे.. विचार करायचा, इतिहास टिकवायचा आणि क्रांति करायची आहे.
धन्यवाद.
- यु-ट्यूब चा विडिओ.
- व्हाट्सअप चे ग्रुप.
- फेसबुक.
आणि ज्यांनी आम्हाला मोबाइल घेऊन दिले ते आमच्या घरचे त्यांचे आभार.
त्यांनी दिलेल्या या वस्तुचा उपयोग आम्ही जटाशंकराची ओळख टिकविण्यासाठी करत आहोत. गर्व आणि अभिमान आहे आम्हाला डोंगरकडेकर असल्याचा. ✊
जटाशंकर महाराज की... जय.!!
----------------------------------------
सुचना: गावातील ज्यांना वाचता येते आणि व्हाट्सअप आहे त्या प्रत्येकाला पाठवा आणि काही तरी करायच म्हना.
फेसबुक ला पण टाका आणि कळु द्या सगळ्यांना.
Comments
Post a Comment