स्वातंत्र्यप्रती असलेले मनातले प्रश्न.

स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला आणि २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले; असे लहान पणापासून ऐकले आणि नंतर पुस्तकात वाचले आणि आज तोंडपाठ आहे.
कित्येकदा ऐकून, साजरा करून, वाचून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी डोक्यात फीट बसले आहे. मरेपर्यंत विसरणार नाहीच.

पण, मला अजून समजलेच नाही “नेमका भारत काय स्वातंत्र्य झाला..?? का झाला..?? कशासाठी झाला..?? आणि कोणापासून झाला..??”
“कधी झाला.?? आणि कोणापासून झाला..?? याचे उत्तर आहेत... १५ ऑगस्ट १९४७ आणि इंग्रजापासून.” 
हे पण इतिहासाच्या पुस्तकातल्या गोष्टी आणि मोठ्या माणसांच्या गोष्टी/भाषणातून ऐकलेला तेवढाच समजला आणि तसाच स्वातंत्र्याचा अर्थ माहिती आहे. बाकी शून्यच!!

लहानपणीचे शाळेचे दिवस.. त्यातील झेंड्याचा दिवस.. रात्री हातावर मेहंदी.. आणि सकाळी लवकर उठून शाळेत जायचं.. झेंडावंदन.. राष्ट्रगीत.. नंतर गावाने निघालेली प्रभातफेरी. 
त्यात एखाद्या चौकात गाव पुढार्यांनी दिलेल्या चोकलेट, संत्र्या गोळ्या चघळत दिलेले भारत माता कि जय.. वंदे मातरम.. एक रुपया चांदी का.. इन्कलाब जिंदाबाद.. या घोषणा.
ते पण, आवाज बसेपर्यंत बोंबलून, तोंडाला फेस येई पर्यंत चीरकायचं ज्याचा घोषणा देऊन आवाज बसला म्हणजे तोच खरा देशभक्त, देशप्रेमी असच वाटायचं आणि आजही त्या वयातल “स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन” बद्दलच ते चित्र तेच आहे. फक्त शिक्षक, विद्यार्थी, नेते एवढाच तो बद्दल.

आणि तेव्हाचे आम्ही थियेटर मध्ये आणि क्रिकेटच्या मैदानावर आमची देशभक्ती दाखवतोच आणि उरली सुरली फेसबुक आणि इतर समाज माध्यमातून प्रकट करत असतोच. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील एखाद्याने काही कामगिरी केली किंवा काही वक्तव्य केली तर आम्ही आमची प्रतिक्रिया देत असतोच म्हणजे आम्ही देशभक्त आहोत!!
आणि देशभक्ती साठी काही नसले तर आमच्याकड  धर्मप्रेम, जातप्रेम, राज्यप्रेम आणि त्याची भक्ती असतेच. हे नसेल तर आमच्या साहेबांची भक्ती, त्यांच्या बद्दलची निष्ठा दाखवत आम्ही या स्वातंत्र्य / प्रजासत्ताक राष्ट्रात प्रकट होतच असतो. आम्ही सर्वमान्य भारतीय आहोत हे सिद्ध होते!!

असे ऐकण्यात आणि वाचण्यात आलय आणि येतंय कि भारतावर इंग्रजांच १५० वर्ष राज्य होते. खूप अन्याय करायचे, त्रास द्यायचे, छळ करत असत म्हणे. आम्हाला त्याचा काही अनुभव नाही; फक्त वाचून, ऐकून आणि चित्रपटामध्ये पाहून अंगावर काटे येऊन गेले आणि फील झाला तो स्वातंत्र्याचा लढा. 
ते काटे आणायची जादू कधी लेखकाने, कधी वक्त्याने, दिग्दर्शक, अभिनेता, कलाकार आणि शिक्षकाने आमच्यावर केली. तो जिवंतपण दाखवून आम्हाला अनुभूती दिली आहे. त्यांच्यासाठी दाद द्यावीच लागणार त्यांच्यामुळे आम्ही तेवढ्या वेळासाठी पूर्णपणे भारतीय होत असतोच. आणि बाकी चालत असतेच!!

आज “स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन” म्हणजे काय..?? भारत म्हणजे काय..?? झेंडा म्हणजे काय..?? स्वातंत्र्य सेनानी म्हणजे काय..?? खरच मला अजून काहीच समजल नाही पास होत मोठा झालो पण समजलच नाही अजून. आणि हे असे प्रश्न विचारून मी माझा अशिक्षितपणा प्रकट करत आहेच आणि स्वातंत्र्य, प्रजासत्ताक देशात असे विचारून देशद्रोहाचा गुन्हा करत आहे कि काय याची मनात भीती वाटत आहे. आणि असेल तर करत आहेच.!!

आजचा प्रजासत्ताक दिन हा ४८ वा प्रजासत्ताक दिन आहे असे फेसबुक शुभेच्छा संदेश पाहून लक्षात येत आहे.
स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झालेत अस आपण म्हणतो. खरा देश कोणता हेच आम्हाला अजून समजला नाही. कोणी सांगते हिंदुस्तान; कोणी भारत; तर कोणी इंडिया.!! प्रश्न येतो आम्ही कोणता देश समजावा आणि देशभक्ती कोणत्या नावाप्रती व्यक्त करावी.??
देश एकच आहे तर मग एवढे नाव का या आपल्या देशाला.?? आमचा अजून नावाचाच गुंता सुटला नाही.
हिंदुस्तान, भारत, इंडिया यातील नावाचाच गुंता सुटला नाही तर मग नेमका कोणता देश १९४७ ला स्वातंत्र्य आणि १९५० ला प्रजासत्ताक झाला.??

मराठी शाळेत, “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.”
इंग्लीश माध्यम शाळेत, “ India is my country. All Indians are my brother and sister.” हि प्रतिज्ञा आम्ही हात समोर करून बोलत मोठे झालो. आजही त्या शाळेत याच पद्धतीत प्रार्थना होत असतात.
यावरून हे समजतय कि, “मराठीत भारत आणि इंग्लिश मध्ये इंडिया” हे असे असल.
मग ते तिसरे नाव ‘हिंदुस्तान’ काय आहे..?? कोणत्याही प्रार्थनेत आले नाही किंवा शालेय पाठ्यपुस्तकात ‘हिंदुस्तान’ स्वातंत्र्य / प्रजासत्ताक असे काही वाचण्यात आले नाही. सोडा हे सगळे निरर्थक आहे.!! आपला संबंध फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी इतकाच असतो. आणि बाकी क्रिकेट आणि चित्रपट. आणि हे सामाजिक माध्यमातून इतकाच आपला संबंध.

आम्हाला स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन म्हणजे....
शहरात चित्र:
“सुट्टी, मनमुराद झोप, सहल, पार्टी, मस्ती!! आणि आजच्या दिवसाची देशभक्ती फेसबुक पोस्ट आणि देशभक्तीपर गाणे लावून जरा फील घ्यायचा किंवा टीवीवर देशभक्तीपर कार्यक्रम बघायचे. देशप्रेमाची चर्चा हा आजचा कार्यक्रम.”

गावाकडच्या नजरेतून स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन :
टीव्ही, रेडीओ, वर्तमानपत्र आणि एखाद्या पुढारी नेत्याच्या भाषणातून रंगवलेला देश आणि त्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी. ग्रामपंचायत.. झेंडावंदन.. शाळकरी लेकरांची प्रभातफेरी, गोळ्या आणि आवाज बसेपर्यंत च्या घोषणा.!!

वरून आदेश आले.. वर्तमानपत्रात आले.. बातम्या टीव्ही वर दाखवल तसे करण्याचा प्रयत्न म्हणजेच स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन.
भारतातले कित्येक गावखेडी स्वातंत्र्य / प्रजासत्ताकाचा लढा याच दिवशी न चुकता देत असतात.

शहरे आनंद साजरा करत असताना आमचे गावकरी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी संविधानाणे दिलेल्या अधिकाराने आणि हक्काने हा लढा सुरु असतो.
महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे ४ दिवस स्वातंत्र्याच्या लढाईचे अधिकृत दिवस आहेत.
काही जणांसाठी हा करमणुकीचा, लढाईचा, हक्क मिळवण्याचा, एकमेकांची खेचण्याचा दिवस; त्या ठिकाणी “ग्रामसभा” हा शासकीय नियोजित “आखाडा/व्यासपीठ” असतो. सगळ्यांसाठी मस्त फुकटात एक लायीव्ह शो.!! 
या चार दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात आणि वर्षभर नियोजन सुरु असतेच. सत्ताधारी विरुद्ध विरोधक!!
याच दिवसी गावचे गटतट, भाऊबंदकी, दुष्म्न्या, आरोप प्रतीअरोप सुरु असतात आणि सगळे प्रदर्शन सुरु असते स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक देशाच. सहीये चालुद्या.!!
स्वातंत्र्य भारतात आजही प्रत्येक खेडे प्रतिष्ठित, मातब्बर, घरंदाज, पिढीजात, घराणेशाही, गावचे मोठे लोक असलेल्या लोकांच्या गुलामीत आहेत आणि हक्कासाठी आणि स्वातंत्र्यसाठी लढा देत आहेत.


न समजलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळेच जन शुभेच्छा देत आहेत म्हणून माझ्यादेखील शुभेच्छा.!!
आजच्या दिवस देशभक्ती.. उद्यापासून.. माझा धर्म.. माझी जात.. आणि आमचे..

जय हिंद.
जय भारत .
-    
    

#Happy Republic Day.

#Proud to be citizen of Republic India.  

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार