सलाम.. पत्रकार
सलाम
पत्रकारीतेला
दिवंगत कवी मंगेश पाडगावकरांच्या 'सलाम' या कवितेने प्रेरीत होऊन आज पत्रकारांसाठी लिहीलेला माझा सलाम.....
मराठी पत्रकारीतेची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांना सलाम,माझ्या बातम्या ज्या-ज्या लेखणीने लिहील्या त्या लेखणीला सलाम, लेखणी ज्या हातात होती त्या हातांना सलाम, ज्यांचे हात लिहिण्यासाठी झटले त्या पत्रकारांना सलाम, पत्रकारांच्या शब्दांना सलाम, वाड्या वस्त्यांवर काम करणाऱ्या वार्ताहारांना सलाम, बातमी टाइप करणाऱ्या ऑपरेटरांना सलाम, बातमीला आकार देणाऱ्या उपसंपादकांना सलाम, फ्रंट पेजची हेडींग ठरवणाऱ्या संपादकांना सलाम,
सलाम माझ्या पत्रकार मित्रांनो, विशाल सलाम
संपादकांना नाव देणाऱ्या दैनिकांना सलाम, सात दिवसाला येणाऱ्या साप्ताहीकांना सलाम, साप्ताहीकांच्या तमाम संपादकांना सलाम, पंधरा दिवसाला येणाऱ्या पाक्षीकांना सलाम, पाक्षीकांच्या संपादकांना सलाम, महिन्याला येणाऱ्या मासिकांना सलाम, मासिकांच्याही संपादकांना सलाम, त्रैमासिकांना सलाम, वर्षातुन एकदा येऊन वर्षभर सोबत देणाऱ्या दिवाळी अंकांना सलाम, त्यात लेख देणाऱ्या लेखकांना सलाम, निवासी संपादकाला सलाम, कार्यकारी संपादकाला सलाम, सहयोगी संपादकालाही सलाम.
सलाम माझ्या पत्रकार मित्रांनो, विशाल सलाम
प्रिंटींग प्रेस मधल्या कामगारांना सलाम, पेपरचे गठ्ठे बांधनाऱ्या गठ्ठेवाल्याला सलाम, बांधलेले गठ्ठे उचलुन गाडीत टाकणाऱ्या हमालाला सलाम, पेपरची वाहतुक करणाऱ्या गाडीला सलाम, पहाटे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला सलाम, स्टॅण्डवर पेपर लावणाऱ्या वितरकांना सलाम, पेपर छापणाऱ्यांना सलाम, पेपर विकणाऱ्यांना सलाम, पेपर वाचणाऱ्यांना सलाम. जाहीराती देणाऱ्या जाहीरातदारांना सलाम, जाहीरातींचे पैसे वेळेवर देणाऱ्यांना सलाम.
सलाम माझ्या पत्रकार मित्रांनो, विशाल सलाम
पेपरमधल्या बातम्यांना सलाम, संपादकीय पानाला सलाम, कृष्णधवल फोटोंना सलाम, पेपरच्या कागदाला सलाम, कागदावर छापलेल्या शाईला सलाम, दैनिकांच्या वेगवेगळ्या फाॅन्टला सलाम, महिन्याला येणाऱ्या बिलपावतीला सलाम, एक रूपया पासुन चार रूपयांना सलाम, सायकलवर पेपर वाटणाऱ्या पोरांना सलाम, पत्रकारीतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला सलाम.
सलाम माझ्या पत्रकार मित्रांनो, विशाल सलाम
--------------------------------------
पत्रकार दिनाच्या.. लेखनीतून शुभेच्छा..
Comments
Post a Comment