ईचितर भारत
गावाकडची मजाच लय न्यारी..
------------------------------------------
"नटसम्राट" पाहुन पेटलो आणि वाटलं कि,.. आई-बाबा, दादा-वहिणी, बहिणी यांच्या सोबत एकदा तरी "थियेटर"(talkies) मध्ये एक तरी movie पहावा.. नानाने ती एक संधी दिलीय आपल्याला.. माय बापासोबत "तब्बल तीन तास" एकत्र बसुन, न बोलता येणा-या विषयांवर नाना बोलणं करणार या विचाराणे गावाकड आलो.. येताना घरच्यांनी शब्द सुद्धा दिला कि, "आम्ही दोन दिवसाची सुट्टी घेतो, आपण movie ला नक्की जाऊ. तु ये..!!"
विश्वास ठेवुन आलो,. पण एक विसरलोच आपल्या घरचे "शेतकरी" आहेत, त्यांना सुट्टी नसतेच.
गांव तर.. मग शेतक-यांची दुनियाच वेगळी.. शेती सोबतच यांच्यावर ब-याच कामाचा ताप, कोणाचा साखरपुडा, तर कोणाची सोयरीक, लग्न, टिळा, तर एखाद्याची मौत, , तेरवी. यापैकी एक जरी skip केल तर यांना जमणार नाहीच. कारण, एका जाग्यावर बसुन यांना होतच नाही.. जमणाच हो.!!
यातून वेळ काढून शेती म्हणजे.. सालगडी.. त्याची मनधरणी.. "देशी"ची सोय नाही झाली तर हा गडी उद्या "दडी" मारणार, मग शेत कामाची "पडी". सालगड्याच स्वप्न एकच, "रातच्याला मालका कडुन चपटी ची सोय. बस्स.!!"
अण् रोजाणे कामाला असणा-यांच दुःख तर लई ईचितर हो.. "काय सांगाव बगा मालक.??"
सध्या गावा गावात सोयरीकीचा "सिजन" चालू आहे.. पारावर, वट्ट्यावर एकच चर्चा.. सोयरीक याची झाली, तीची झाली.. एवढा हुंडा घेतला ,.. तितका दिला..!!
शेतकर्यांचा उत्सव म्हणजे फक्त दिवाळी अण् जत्र झाल.. बाकी वर्षभर मर मर करायची अण् "पैसा" कमवायचा.. अण् एकदाच, "आमदाची सुगी चांगली झाली, पुढच्या बी वर्षी होऊदे.." अस म्हणत, तिरुपति बालाजी, शिर्डी साईबाबा या देवांना प्रसन्न करण्यासाठी "दान" रुपी रिश्वत द्यायची.. वर्षभर ज्या पैस्यासाठी घाम गाळला ते पैसा त्या तिथ देवाला देऊन यायचा. घरचे लेकर बाळ शिको अथवा न शिको जमीन आहेच की. एवढच शेतक-यांच काम.. ना स्वप्न आहे, ना विचार .!!
स्वप्न म्हणजे "लेकीच लगण" शेजा-यां पेक्षा थाटात कस होईल अण् हुंडा किती जास्त देणार ..?? बस्स एवढच यांच्या डोक्यात.
आराम नको.. कोणती मजा नको.. टाल्कीज पिचर नको.. आपण शेतकरी आहोत.
शेतकर्यांचा "भारत" लय इचितर हो.. या लोकांकड पण आज WhatsApp, Fb, hike आहे. महागड्या गाड्या अण् मोबाईल बी आहेत. पण त्याच कराव काय हे जमना हो अजुन "सांगा कि जरा पाटील.."
# उद्या पाटलाच्या पोराचा टिळा हाय.. बूंदी हलवायला.. रातच्या सयपाकाला सगळ गाव संग आलय.. चहाचा पुर आलाय.. तंबाकू पुड्यान तोंड फुगुन आहेत.. वासच वास.. गंजी पत्याच डाव बी बसलेत .
.तुम्ही बी या हो टिळ्याला. चुलबंद अवताण आताच सांगायलो.
--------------------------------------------
"नाना" आम्हाला जमलच नाही कि हो.. सहकुटुंब सपरिवार .
Comments
Post a Comment