नानाचे उपकारच...
नटसम्राट "--"असा नट होनेच नाही"
प्रत्येक बाप हा आयुष्यात 'नट'च असतो,
पण ह्याच कलाकरची अदाकारी नंतर मूलानां बेकारी वाटते.
नवरा, मुलगा, काका, मामा, नोकरदार, मित्र असे कित्येक अभिनय करताना जबबदारी पार पाडतानां आपल असण विसरायला होत.
आणि ह्याच मुळे सर्व बाप लोकानि हा नटसम्राट नक्की बघावा.
आणि ज्याना आपल्या कर्तव्य सिध्दीची जाण करून घ्यायची आहे त्यांनी तर नक्कीच बघावा.
आणि हो ,
डोळ्यात अश्रुंचा दुष्काळ असणार्यांनीच बघावा , नाहीतर ओला दुष्काळ आल्यशिवाय राहणार नाही.
नात्यांचा गुंता सोडुन,
तुटलेली दोर.. गाठ न मारता जोडायची असेल त्यांनी एकदा बघाच.!!
आणि अनुभवा सोबत घेवुन या शब्दांची ताकद व आवाजाची जादू.
माय बापासोबत बसण्याचा,
भावनांशी बोलण्याचा,
प्रत्येक्ष न बोलता, मतभेदांना तिलांजलि देण्यासाठी एकदा बघाच..!!
आई वडिलांसोबत बसुन आनंदात, हसत-खेळतं आणि रडत सुद्धा बघण्याची संधी सोडुच नका ..
न जाणो भविष्यात असे चित्रपट येतील आणि भावनांशी बोलतील .
नानाचे आपल्या पीढीवर केलेले हे उपकार आणि संस्कार .. फक्त "नटसम्राट".!!
दि: २/१/२०१६.
ठिकाण: नांदेड.
Comments
Post a Comment