दंगल.. स्वप्नांची.!!

दंगल गीता, बबीता, आणि महावीर फोगट...
( इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांची दंगल.)

काय आहे नेमकी स्टोरी, कोणासाठी आहे.??

दंगल म्हणजे मनातल्या मनाची कुस्ती..
ज्या कुस्तीत कधीच आपल्या मनासारख होत नाही.. पन ती कुस्ती खेळायची ती जिंकण्यासाठीच..!!!

पडद्यावर दंगल पाहुन बापाची दंगल कळते. आणि प्रश्न पडतात..
का असतात स्वप्न.. काहीच लोकांसाठी.??
का मरतात आणि मारतात आपल्यातल्या त्याला.. काय मिळते..??
किती सोप आहे जीवन, का अवघड करुन घेतात ते लोकं..??

महावीर फोगट तुम्ही खरचं का केल हे सगळ..??
देशासाठी.. लेकीसाठी.. खेळासाठी कि प्रत्येक बापाचा मेसेज लेकरांना सांगण्यासाठी..

 कि "एक अपूर्ण स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी बाप काय काय करतो.??" हे दाखवण्यासाठी.

आजच्या काळात आम्हाला जे चांगल दिसते ते पाहिजे असते.
पण, का मिळत नाही.. 

हरतो आम्ही, 

लडतो आम्ही,
कित्येकदा पडतो.. पुन्हा लढतो.
पण कधी जिंकतो..?? हेच कळत नाही..

म्हणून कधी कधी जिवंत पणेच मरतो.!!

बाप असतोच सगळ्यांच्याच आयुष्यात,
कधी कधी नको वाटतो, जुना होतो..
राग येतो, त्याच्या पद्धति आणि काम पाहुन. 

स्वतःचा कि त्याचा तेच कळत नाही.
आणि वाटत का मरतो बाप.. एकाच स्वप्नासाठी.??

त्यातच एक दिवस त्याला सोडुन बाहेर पडतो आम्ही,
आणि भेटतात कित्येक गुरु..
गुरु सांगतात मोठ्या गोष्टी आणि आवडतात आपल्याला त्या..
म्हणून गुरु मस्तच वाटतात..
चुक नसतात गुरु!
कमी असते ते गुरुंच्या स्वप्नांची.
कारण त्यांना स्वप्न नसतात, त्यांच्याकडे आपल्या सारखे कित्येक येतात आणि कित्येक जातात.. 

म्हणून काही फरक पडतच नाही. गुरुंना.!! 

गुरु सोबत असताना बापाला विसरतो
आणि आपण हसतो, खेळतो, पडतो आणि शेवटपर्यंत का हरतो तेच कळत नाही.

म्हणून मग रडतो.. त्या रडण्यात क्षणोक्षणी बापच दिसतो.
आठवतो ते क्षण आणि त्याचे शब्द..
बेट्टा...
" मनातल्या स्वप्नांची दंगल आहे ही.! "

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार