Role of Youth in the Development of India.
देशाच्या प्रगतीतील तरुणांची भूमिका.
"भारत हा तरुणांचा देश आहे." याच शब्दाने आज भारताची आणि तरुणांची ओळख करुन दिली जाते. कारण आज *एकूण भारतीय लोकसंख्येच्या ६५% लोकसंख्या हि तरुणांची लोकसंख्या आहे. त्यात १३ ते ४० वर्ष वयोगटातील तरुण येतात आणि हि लोकसंख्या तब्बल ८० कोटी आहे.
आकडे पाहुन लक्षात येते की भारत का शक्तिशाली होऊ शकतो..??
भारत हा तरुणांचा देश आहे. हे सर्व जग ओळखुन आहे . आणि "तरुण देश घडवू शकतात आणि बिघडवू शकतात." देश घडवायचा असेल तर. आपली शक्ती ओळखून त्या शक्तीला एक दिशेने मार्गस्थ करणे अनिवार्य आहे.
महान अमेरिकन विचारवंत जेम्स तरुणांची व्याख्या करताना म्हणतात, "तरुण म्हणजे आनंद, लहान पक्षी जो नुकताच अंडी बाहेर पडला आहे आणि उत्सुकतेने स्वातंत्र्य आणि आशेच्या खुल्या आकाशात त्याचे पंख पसरवण्याची उत्सुकतेने तो वाट पाहत आहे. गरज आहे ते त्यांना पंख देण्याची."
तरुण म्हणजे काय तर, "लाथ घालीन तिथं पाणी काढीन." हे अस वय असते की जे ठरवलं ते होते. आपण ऐतिहासिक महापुरुषापासून ते अगदी आजच्या महान नेत्यांचा, उद्योगपती, कलाकार, लेखक, खेळाडू, साहित्यिक, विचारवंत, यांचा अभ्यास केला आणि विचार केला तर लक्षात येते की, "या सर्वांनी त्यांच्या तारुण्यात खूप धडपड, खटपट, केली आहे आणि आज या उंचीवर पोहचले आहेत."
तारुण्याची ज्यांनी किंमत ओळखली ते सर्वजण समाज, देश यांच्यासाठी आदर्श असतात.
खरे तर प्रत्येक देशाच्या विकासाचा प्रगतीचा गाडा हा तरुणांच्या खांद्यावर असतो.
आज आपल्या भारतीय तरुणांचा विचार करण्यात आला तर लक्षात येते की, आपले तरुण कुठे आहेत, गावापासून ते शहरापर्यंत विचार केला तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते "नवीन आलेले कोणतेही तंत्रज्ञान, कला, विज्ञान, गोष्टी यांना लगेच आत्मसात करण्याचे कौशल्य हे प्रत्येक तरुणांकडे आहे. मोबाईल हे सर्वात मोठे उदाहरण. कुठेही बसून जगाशी नाते जोडण्याचे तंत्रज्ञान किती लवकर स्वीकारले गेले आणि त्यातून आजचा तरुण युवक हा एकजूट होत आहे आणि नवीन गोष्टीच्या शोधात सतत खटपट करत आहे."
हे मोबाइल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मागील ५ वर्षांपासून आपण जागतिक आणि राष्ट्रीय स्तरातील तरुणांचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की ही तरुणाईची शक्ती केवळ राजकीय क्षेत्रात बदल आणि स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आलेला आहे. २०१४ चे लोकसभा, विधानसभा, अण्णा हजारे यांचे लोकपाल बिल साठी असलेले आंदोलन, विविध आंदोलने आणि अश्या भरपूर घटना आहेत त्या केवळ तरुणांच्या मदतीने यशस्वी झाल्यात. यातून एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे तरुणाईला बदल आवडतात, काही तरी चांगला व्ह्यायला हवे हि पूर्ण प्रामाणिक पणे वाटते त्यामुळेच ते सर्वांगाने झोकून कार्यरत असतात. राजकीय लोक हे ओळखून असतात आणि त्यांचा उपयोग पण हे सर्व राजकीय क्षेत्रात दिसून येते.
यंग लोक ताकती असतात, परंतु ते योग्य दिशानिर्देशित केले पाहिजेत हे सर्व जग जाणून आहे.
"सर्वात वाईट शत्रू एखादे वेळेस हानी देणार नाहीत, परंतु, भ्रष्ट तरुण कदाचित समाजाला अधिक हानी पोहोचवू शकतात."
आणि, देशाच्या भविष्यावर अवलंबून राहणे हे तरुणांच्या खांद्यावर आहे कारण ते नवीन मूल्ये, नवीन विचार आणि जीवनातील नवीन मार्ग दर्शवतात.
राष्ट्राच्या भविष्यातील कल्याणाला त्याच्या तरुणांच्या हातून सुवासिक फुलणारा आढळतो. युवकांनी प्रत्येक परिस्थितीत भारताच्या पुनर्वसनाची जबाबदारी वैयक्तिकरित्या खांद्यावर घ्यावी,
सध्याच्या परिस्थितीत नेमके काय आवश्यक आहे की युवकांमध्ये अत्यंत गुप्त देशभक्ती आणि राजनैतिकता बाहेर आणणे, जे जबाबदारीची आग पेटवते आणि राष्ट्रांच्या उद्धारासाठी त्यांना समर्पण करेल. आधुनिक भारताच्या वाढीला अडथळा आणणारे प्रमुख कारण म्हणजे:
1. दहशतवाद
2. भ्रष्टाचार
3. सांप्रदायिक असमानता आहे.
आजच्या सोसायटीने स्वतःला तरुणांच्या विचाराप्रमाणे ढाळावे कारण जुन्या पिढीसाठी नवीन विचार करणे कठीण आहे. तरुणांना भविष्यात आशा आणि आत्मविश्वासाने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये जनतेमध्ये काम करण्यासाठी आत्मा असणे आवश्यक आहे आणि इतरांना अनुसरण्यासाठी मार्गदर्शन करण्याची भावनादेखील असणे आवश्यक आहे.
आजच्या तारुणासमोरील आव्हाने हि गरिबी, रोग, बेरोजगारी, बेकारी, स्थिरता आणि सर्व प्रकारचे विभाजनकारी शक्तींपासून स्वतःला आणि देशाला मुक्त करणे.
किंबहुना जुन्या पिढीतील नागरिकांना एक नवीन मार्ग स्वीकारणे अवघड आहे. तरुणांना मात्र हे कठीण नसते, परिस्थितीच्या मागण्यांनुसार ते त्यांच्या कल्पनांचा अवलंब, फेरबदल आणि बदलू शकतात. म्हणूनच भारतातील तरुणांनी त्यांच्या जबाबदारीला त्यांच्या खांद्यावर घ्यावे.
तरुणांना त्यांच्या शक्तीची जाणीव होणे आवश्यक आहे, त्यांना ती शक्ती दाखवणे हवे आणि त्या शक्तीचा उपयोग लोक कल्याणातून राष्ट्रकल्याणासाठी करणे आवश्यक आहे.
आज जर तरुण मोठ्या प्रमाणात कोठे आहे याचा शोध घेतला तर लक्षात येईल, राजकारणातला कार्यकर्ता, आंदोलक, बेरोजगार, दिशाहीन, समाज माध्यमातून सक्रिय, स्पर्धा परीक्षेतून चांगले जीवन मिळेल या आशेवर शहरात येऊन पडलेला तरुण, आज अगणित तरुण अभियंत्यांची संख्या भारतात आहे परंतु हे सर्व खरेच नवं काही करण्यासाठी वैचारिक आहेत का हा संशोधनाचा विषय आहे.
राजकीय आणि नोकरी या दोन क्षेत्रव्यतिरिक्त असलेली दुनिया दिसणे आवश्यक आहे.
भारत हा कृषिप्रधान, खेड्यांचा, आणि तरुणांचा देश आहे हे सर्वमान्य सत्य आहे. परंतू, कृषिप्रधान देशात नवयुवक हे कृषी क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे खूप कमी दिसून येते, तरुण - कृषी - खेडी यां तिघांनी एकत्रित रित्या येणाऱ्या काळात कार्य केले तर भारत हा विकसनशील या ओळखीतून विकसित देश होणे कठीण नाही.
तरुण म्हणजे नव कल्पनांनी, स्वप्नांनी, विचारांनी चालणारी खान आह आणि त्या खानेची एक मोठी वेगवान नाव आहेेे जिचा वेग हा काळाच्या कित्येक पटीने पुढे असतो.
ज्यांना हि खाण भेटली आणि दिशा मिळाली त्यांनीच या पृथ्वीला एक ओळख आणि कल्पनेचे ठिकाण म्हणून घडवले आहे.
ज्या देशातील तरुण चौकस त्यांना कुठेही कोणीही आडवु शकत नाही. गरज आहे त्यांना त्यांचे स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य आणि पूर्ण करण्याची ताकद देण्याची.
तरुण - कृषी आणि खेडी हे प्रगत भारताचे केंद्रबिंदू आहे. या तिघांचा विकास तर देशाचा विकास.
- योगेश अडकीने, नांदेड.
8149817839.
(y)
ReplyDelete:) nice one ..keep writing
ReplyDelete👏👏👏
ReplyDeleteKhup Chan Yogesh..
ReplyDeleteKhup mast lhiliay Patil...
ReplyDelete