दिवाळी २०१६!!
दिवाळी जटाशंकरासोबत.
नमस्कार!! स्वयंभु जटाशंकरा..
दिवाळी निमीत्त थोड काही बोलाव म्हणतोय आपल्या सोबत..
कसय बगा, मागच्या वर्षी दुष्काळात तुमची लय आठवन असायची.
जास्त काही काम नव्हते म्हणून वेळ द्यायला जमायचा..
यंदा.. तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या प्रार्थनेने इंद्रदेव प्रसन्न झालेत आणि त्यांच्या क्रुपेने चांगला पाणी पाऊस झाला.. सगळी कड कस एकदम प्रसन्न वातावरण आहे..
समद्या शेतक-यांची सुगी एकदम झ्याक आहे, सगळे खुश आहेत. हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे सगळे करते करविते विधाते तुम्हीच आहात..
आमच्या सारखे गाव सोडुण बाहेर राहणारे कित्येक जण दिवाळी निमीत्त घरी येतात, लहानपणीच्या मौज मस्तीच्या आठवणींची शिदोरी तुमच्या टोलेदार मंदिरात सगळे जण वाटून खातात. पुन्हा एकदा लहान होतो आम्ही दर दिवाळी ला..
हे माझ लेखणीतून तुमच्यासोबत बोलणे म्हणजे kind of appreciation हो. बाकी काही नाही..
यावेळेसची सुगी पाहुन सर्व आनंदात आहेत या सुगी वर कोणाची नजर पडु देऊ नका ही एवढी विनंती.
जसा तापत्या रानात.. आणि भिजत्या पावसात.. शेतक-याणे, कष्टक-याणे
घाम गाळलाय ना तसा दाम भेटेल याची जरा.. काळजी घ्या हीच मागणी .
ही सगळी कामे तुमच्या Department मध्ये येत नाहीत, पण तुम्ही सगळ्यांचे High Command. म्हणून..
देणारे, घेणारे, मरणारे, जगनारे सगळे लोकं तुमच्या पायाजवळ लोटांगन घालतात.. सगळ्यांना फक्त दुष्काळाची आठवन राहील एवढी काळजी घ्या.
आमदा.. सगळ्या लेकी बाळी, भाचे, नातु पणतु यांची दनक्यात दिवाळी होईल.
असाच आशीर्वाद सदैव राहु द्या.
पावसाळा सुरु झाल्या पासुन लय वेग वेगळ्या, तुमच्या syllabus च्या आणि network च्या बाहेरच्या गोष्टीने मान वर केली हो..
बलात्कार, जात, धर्म, आरक्षण, पाकिस्तानी कुरापती, घोटाळे, युद्ध, घुसखोरी, कुपोषण, डाळ, चिनी प्रोडक्ट हे Item जरा market मध्ये जोर धरत आहेत.
दुष्काळ आणि आत्महत्या यांच market controll केलय तुम्ही.
जरा या Item कड लक्ष देता का हो.??
हे First Sem तर मोर्चे काढण्यात शांततेत गेला.. लाखों, कोटी या आकड्यातच मोर्च्यात सगळे माणूस असलेल्या लोकांनी जातीचे Card घेऊन सरकार च्या दारात टाहो फोडायला सुरु केला आहे. या टाहो मध्ये माणसांच काही बर वाईट होऊ नाही याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार.
ते सरकार म्हणजे कस आहे माहीती का.?? "लोकांनी लोकांकडून लोक कल्याणासाठी लोकांमार्फत लोकांसाठी केलेल.लोकशाही सरकार."
हे असं होत, पण ते लोकांना काय जमल नाही असच वाटतय.. जात, पात, धर्म, देश, प्रांत, गरीब, श्रीमंत, हे सगळे या लोकांमध्ये येतात. म्हणून हा सगळा खेळ Flop ठरतो कि काय.?? असा प्रश्न आहे..
बर आहे जटाशंकरा, हे असा प्रकार तुमच्या कडे नाही. तुम्ही माणुस तयार केला होता तर या माणसांनी लोकं तयार केलेत.
तुम्ही बनवलेल्या माणसांमध्ये आणि माणसांनी बनवलेल्या लोकां मध्ये लय मोठा फरक आहे.!!
तुम्ही एक बनवल.
आम्ही.. जात, धर्म, प्रांत, देश यांमध्ये फोडून घेतलय.
तुम्ही आम्हाला माणूस या Product सोबत प्रेम, माया, निरागसता, आदर, सन्मान हे Inbuilt App. Install करुन दिले होते.. आम्ही ते Force Stop केलेत, त्यांचा RAM clear केलाय.
आम्ही लोकांनी नव नविन App तुम्ही बनवलेल्या या Product मध्ये Install केलेत राग, नैराश्य, स्पर्धा, अतिरेक, इर्षा, लालसा, राजकारण, खतेस हे ते Daily Used App आहेत.
या दिवाळी ला तुम्ही पण जरा या Product कडे लक्ष द्या..आणि ते तुम्ही Inbuilt दिलेले App चा वापर वाढावा या करिता काही Special Offer जाहिर करा..
स्वयंभु जटाशंकरा हे आरक्षण, जात, पात, धर्म, गरिबी, श्रीमंती यांच्यावर काही तरी Perment Solution द्या हो आम्हा लोकांना
काही Range भेटली तर घ्या हे विषय जरा seriously. अण् सांगा सर्व भक्तांना पुजा, प्रार्थना करताना जरा जमल तर.. माणूस व्हा म्हणून.!!
( जटाशंकरा, आजच्या काळात सगळ्या गोष्टी Social Media वरच सांगाव लागतात.. तरच अडचणी दूर होतात, नाहीतर काही होत नाही. तुम्ही सुद्धा Facebook, Twitter, वर या.. तुमचे सगळे भक्त Online भेटतील तुम्हाला..)
Happy Diwali.!!
#दिवाळी जटाशंकरासोबत 2016.
Comments
Post a Comment