दिवाळी २०१७!

दिवाळी जटाशंकरासोबत.!!

नमस्कार, देवा जटाशंकरा.

पुन्हा एकदा दिवाळी आली,
भेटू आणि बोलू आपण या वर्षी देखील.
हो! सगळ्यांच्या समोर सोशल मिडिया वर.
एकट्यात बोलेल्या गोष्टी तुझ्या आणि माझ्यात राहतील आणि तू सुद्धा त्या लिहून ठेवलेला पुरावा नाही म्हणून विसरून जाशील म्हणून हा लिखाणातून जाहीर पणे  बोलण्याचा प्रयत्न.
हे लिहून का बोलतो तुला वाटत असेल तर, आमच्या माणसाच्या दुनियेत लिहून असणाऱ्या गोष्टीनाच जास्त महत्व आहे आणि त्यावरच विश्वास बसतो हे माहिती.
लिहून न ठेवता बोलेली शब्द ही आश्वासन असतात, थापा असतात.
हे या वर्षात समजल देवा.!!

"मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणे म्हणजे अपेक्षा आणि आश्वासन यांची युती असते, आणि दोन्हीही कधीच पूर्ण होत नसतात."

म्हणजे नुसता बोलणे म्हणजे तो क्षण जिंकण्याचा आणि काम काढून घेण्याचा प्रयत्न असतो, फुकटात स्वप्नात उडायचे. हे स्वस्त माध्यम.

दिवाळी निमित्तच खरं तर आपला बोलणे होत असतं नाहीतर आपला नेहमीच असता हे दे,.. ते दे,.. असा कर,.. तसं कर,.. फक्त हे एकच मागण आहे,.. एवढं काम होऊ दे..
असा म्हणून भली मोठी यादी तुझ्या कानात आणि आमच्या मनात असते.

हे बघ देवा! या एका वर्षात खूप जाग्यावर फिरुन आलो, बोलून आलो, पाहून आलो आणि खूप काही ऐकून आलो.
आणि बरेच काही वाचून आज तुझ्या समोर ते सांगण्यासाठी हे इथे लेखणी घेऊन बसलोय. त्यामुळे जरा मागच्या वर्षी पेक्षा थोडा बदल वाटेल, आपल्या बोलण्यात.
कसं आहे ना ते 'आनं देऊन ग्यान येतं' ते हे प्रकार. समजा.

आणि हे सगळं तम्हाला चांगला माहिती, तूम्ही नेहमी पाहता. आणि तसही यावर्षी जास्त काळ तर तुमच्याच सानिध्यात होतो. टाळही वाजवला, सप्ताह्यात पण होतो.
त्यात मला ते, "उद्धवा अजब तुझे सरकार " लै आवडला,.

तर आता दिवाळी बद्दल, गावं पाहिली, वाचली, ऐकली म्हणलो ना आधी.
तर, प्रत्येक गावात तुझ्या शाखा दिसल्या, तुझी नाव वेगळी आहेत पण जागा आणि काम तशीच, आपल्या गावात जसा तू गावाच्या बाहेर मसन वट्याजवळ आहे तसाच सगळीकडं तुझी राहण्याची जागा. निवांत आणि शांत.!!

दिवाळी निमित्त आम्ही अशी पाखरा सारखी ह्या गावातून त्या गावात उडणारी लोकं दिवाळीनिमित्त हक्काच्या घरट्यात येत असतो.
माय, बाप, दादा, भाऊ, काका, काकू, मामा, मामी, आजी आजोबा, जुनी दोस्त या सगळ्या मंडळीत येऊन चार दिवसाच्या फराळात एक वर्षाची शिदोरी घेऊन पुन्हा नव्याने उडतो.
म्हणूनच आम्हाला दिवाळी आणि तुझी ओढ असते.

यावेळेस तसा पाऊस आणि पाणी चांगला झाला, महाराष्ट्राची सर्व धरणं भरून गेली.
नेहमी सारखं तू व्यस्त असल्या कारणाने विदर्भाकडे दुर्लक्ष केले आणि नेमका तिकडे पाऊस कमी झाला, आणि आपल्या गावाला ज्या धरणातून पाणी येते ते धरणं अजून २५% च्या आतच आहे म्हणून, बागायतदार जरा भविष्याकड पाहून हवालदिल आहेत, केळी आणि उसाचे नियोजन कसे करावे हे एकच प्रश्न जरा किचकट आहे.

अरर देवा, विदर्भ म्हणलो म्हणून एक आठवलं ते तिकडचे काही ३०-३५ शेतकरी कीटकनाशक फवारून तुमच्याकडे आलेत म्हणे, आणि बरेच जण डोळे गमावून बसलीत, काही अपंग झाली माहिती का..?? हो ३०-३५ शेतकरीच.
मुंबईतून तब्बल २२ जण आले हे तुला माहिती असेल. कारण, ते 'माणसं' आहेत आणि हे किटकनाशक फावरणारी 'शेतकरी'.
आम्ही सुद्धा या ३०-३५ शेतकऱ्यांना 'भावपूर्ण श्रद्धांजली' वाहिली नाही, ना दोन शब्द लिहलेत.
कारण मुंबई, दिल्ली, पुणे आणि शहरात राहणारी मानसे महत्वाची आहेत, 'रेव्हेन्यू' जनरेट करणारी आहेत, आणि सरकारच्या खात्यात पैसे भरणारी म्हणून ती महत्वाची.
शेतकरी काय जगला काय मेला काय दुसरा तयार होतोच नवा शेतकरी.. असा असतं आमच्या लोकांत.
शहरातील लोकांच्या सुखसुविधेकरिता आंदोलन होतील, मागण्या दिल्या जातील, कारवाई केली जाईल. आणि निर्णय देखील घेतील त्यावर अंमलबजावणी ही होईल.
परंतु, शेतकरी, 'बळीराजा आणि कृषिप्रधान ह्या शब्दांनी खुश होणारी.'

ते कीटकनाशक, औषध, पाणी  चा काय म्याटर आहे ते बघा आणि तुमच्याच कार्यालयात आपल्या भागाकरिता तो प्रश्नच सोडवा. देवा.

लय विषय आहेत या एका वर्षाची, म्हणजे तुझ्या जत्रेत देखील एवढ्या रांगा कधी लागल्या नसतील इतक्या रांगा बँक, ATM, दवाखाने, स्टेशन, झेरॉक्स दुकान, यांच्याबाहेर लागल्या होत्या, खरं तर रांगेत उभं राहूनच हे वर्ष गेला.

नोटबंदी आली आणि मग त्याबद्दल काय सांगू, वाचून, ऐकून, पाहून लोकं आता बोलायला लागलीत त्यांनाच डायरेक विचारा, कॅशलेस सोसायटी करणार आहेत त्यात तुझी दानपेटी देखील आता आम्हाला 'पे टियम, फोनपे, तेज, भीम इथं कुठं असलं तरच काही टाकता येईल अन्यथा जमणार नाही कारण, 'नोटबंदी'.
"तुमची दानपेटी आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या सोबत जोडा आणि यु पी आय कोड जनरेट करा." असा सांगावं वाटायचं त्या वेळी. नोटबंदीच्या काळात. पण, ते चक्क 'भपाऱ्या निघाल्या.'

'एक देश, एक कर' प्रणाली आणली आणि अजून आम्ही '२,५,११,१८ आणि २८' या मध्ये 'एक' शोधत आहोत.
हा खेळ तर खूप भारी आहे देवा, आधीच रिकामी झालेली लोकं या नवीन खेळात आणखी रिकामी झालीत.
हो! अर्थात.💰

असं हे एकंदरीत आपला बोलणे, या वर्षात खूप माणसे पाहण्यात आली,

साता समुद्रापार राहून मदतीचा स्वतःहून हात  देणारी,

स्वप्न दाखवणारी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देणारी,

तर काही स्वप्नांच्या दिशेने स्वप्नात धावणारी.

काही नुसतीच बोलणारी, काही त्यातून काम काढणारी,
कामाचंच बोलणारी,

काही खिशात एकही रुपया नसताना माणूसकीच्या विश्वासाने सायकल ने जगभ्रमंतीवर गेलेली,

काही काहीही होउ दे आमच्यावर काही परिणाम न होणारी,
अशी बरीच गर्दी आहे येथे माणसांची.

तुमच्या सारख्या देवांची गर्दी कमी आहे म्हणून आशेने आणि सन्मानाने आमचे हात तुमच्या समोर जोडतात, आणि मन फुलतात.

हि सगळी माणसे कुठेही असुदे, कोणीही असुदे दिवाळी आली की तुझ्या सावलीत येतात.

दिवाळीनिमित्त ते जुनेपण आठवतात, खेळतात, जुनेपण शोधत नव्याने आणखी घट्ट जोडतात ते तुझ्याच मंदिरात. घरट्यात.!!

देवा!! या भावनेच्या गर्दीत सगळ्यांना सांभाळून घे, पाच दिवसाची दिवाळी प्रत्येक महिन्यातुन दोन दिवसाकरिता येऊ दे.!!

आणि चांगला RAM, High MP, Full Network, High HD, या  क्वालिटीसह सर्वांना संभाळून घे.

#लिख के दे!

#दिव्यांची दिवाळी स्वयंभू श्री जटाशंकरासोबत.#२०१७.

*Happy Diwali.!!*

- Yogesh Adkine.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार