महिला दिन
आज जागतिक महिला दिन...
सगळ्यांच महिला प्रति प्रेम उतु जाणार,..
गोडवा गाणार, कविता करणार, लेख लिहिणार, त्यांचा महिमा गायला जाणार आज..
सर्व सर्व महिला प्रतिचा महिमा सांगणारा कंठ दाटून येणार.
फक्त ते एकाच दिवसाकरिता..??
बलात्कार शब्द एेकला वाचला कि मन धस्स होणार, प्रत्येक संवेदनशील माणूस येथे विव्हळणार.
नेहमी बलात्कार स्त्री वरच का होतात..?? याचा विचार करतो आपण.??
हो! निसर्गाने म्हणा, देवाने म्हणा, निर्मात्याने म्हणा स्त्री ला आकर्षक, सुंदर, गोंडस, गोड असे प्रत्येकालाच हवे असणारे, आवडणारे गोष्टी दिल्यात.. ती निर्मितीच, नैसर्गिक!!
परंतु, माणसातल्या या स्त्री आणि पुरुषाने या सगळ्या गोष्टींचा गोंधळच केला आणि अडकून घेतले.
माणूस (स्त्री-पुरुष) हा प्राणीच आहे हे विसरला आणि निसर्गाने निर्मीत गोष्टींत स्वतःचे डोके चालवायला लागला. मग त्याला प्रगतिची ओढ लागली त्यातून हे अवगून कि गूण निर्माण झालेत.
नैसर्गिक रित्या दोघेही आकर्षित होणे हे साहजिक आहे, प्राणी आहोत हे विचार केला तर.!! अगदी इतर प्राण्यांप्रमाणेच.
परंतु, माणसाने निसर्गाची दुनिया सोडुन स्वतःच्या कल्पनेतून स्वतंत्र विश्व तयार केले, त्यात नियम आहेत, अटी आहेत, मर्यादा आहेत, शिकवन आहेत या सगळ्यांच्या मिश्रणातून माणूसकी तयार झाली.
त्या माणूसकी च्या विचारांतून स्त्री आणि पुरुषांचे स्वतंत्र विश्व आणि त्यांचे नियम आले.
आणि जेंव्हा माणूस या प्राणी प्रकारातून स्त्री आणि पुरुष या प्रकाराची निर्मीती झाली तेंव्हा पासुन स्त्री कडे बघण्याचा माणसाचा द्रुष्टीकोनच उपभोग घेण्याचा निर्माण झालेला. तीला गुलाम म्हणून पहाण्याचाच आहे.
स्त्री ने ही ती पुरुषी सत्ता मान्य केली. आणि तिने काळजी, शांति, प्रेम, करुणा, माया, ममता हे क्षेत्र स्वतःकडे घेतले.
*पुरुषाने* राग, द्वेष, तिरस्कार, वाद, जबरदस्ती, माज, वर्चस्व, पुढाकार, सत्ता हे क्षेत्र घेतले.
आजचे मानवनिर्मितीचे हे २१ वे शतक. खुप बदल करत माणूस येथ पर्यंत आलेला आहे. तो सर्व सीमा तोडून जागतिक झालेला आहे. कुठल्याही सामाजिक सीमा नाहीत आज त्याला माणूसकिने त्या तोडून तो एकत्र येत आहे.
परंतु, माणसाची मानसिकता स्वतःच्या डोक्यातील स्वतंत्र विचार, मानसिकता हे त्याला तुटत नाही आणि माणूस जवळ जरी असला तरी तो एक नाहीच. बलात्कार, अण्याय, पुरुषी सत्ता, युध्द, तिरस्कार हे आजूनही कमी नाहीतच होत.
जागतिककरणात तो आजही एकटाच आहे.
त्याला(माणसाला) त्याचे जूणे प्राणीपन सुटत नाही आणि इतर प्राण्यांना जसे व्यक्त होता येत नाही तेंव्हा त्याच्यातले प्राण्याचे हिंस्र गूण नैसर्गिकरित्या येतात आणि प्राण्यांप्रमाणेच बेदिक्कत, बेफिकीरपणे वागायला सुरु करतो आणि गुण्हे करायला सुरु होते. जे कि माणसाच्या दुनियेला मान्य नाहीत.
माणसांने स्वतःला व्यक्त होण्याकरिता कित्येक क्षेत्र निर्माण केलेत आणि त्याच्यातले जंगली प्राण्याचे हिंसक एक एक गूण कमी केले.
आणि तो साचेबद्ध माणूस झाला. व्यक्त होण्याकरिता खेळ, संगीत, शेती, चित्र, लेखन, कविता, गायन, प्रवास, काम बोलने या सारख्या गोष्टीत स्वतःला व्यस्त केले आणि त्याची किंमत वस्तु म्हणून पैसा निर्माण केला त्याच्यामागे लागताना तो प्राणीपन विसरतो. आणि साचेबद्ध माणूस होतो. आजूनही तो पूर्णपणे त्याची दुनिया निर्माण करण्यात यशस्वी नाही झाला.
नैसर्गिक प्राण्यांप्रमाणेच लक्षण, गुन तो दाखवत असतो आणि माणसांच्या दुनियेतले गुण्हे करतोच तो. बंधन निर्माण करण्याकरिता त्याला व्यस्त आणि व्यक्त व्हायला जमला तरच तो (स्त्री - पुरुष) निसर्गापासून अलिप्त माणसाची दुनिया बनवू शकेल.
जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय माणसांचा विचार केला तर,...
धर्म, जात, गट, तट, मानसिकता, गरिबी, श्रीमंती, या गोष्टींचा विचार करत स्त्री आजही स्वातंत्र्य नाहीच.
आणि भारतातले जे पुरुष व्यस्त किंवा व्यक्त होत नाही त्यांच्या हातून चुका, गुन्हे हे होत आहेत.
जोपर्यंत व्यस्त होण्याकरिता काम मिळणार नाही, किंवा करणार नाही तोपर्यंत गुण्हे हे होतच जाणार. जो व्यस्त आहे तो गुंतून राहतो..
आणि व्यक्त करते येणार नाही आणि व्यक्त केलेल समजून घेणार नाही तोपर्यंत माणूस निसर्गापासून वेगळी माणूसकीचा विश्व तयार करणे अशक्यच!!
आज तरुणांनी (स्त्री-पुरुष) व्यक्त करायला पाहिजे आणि व्यक्त केलेले समजून घ्यायला पाहिजे तरच. शांति, समाधान, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आवड, आकर्षण हे प्रत्येकाला हवे असलेले नैसर्गिकपणा विना अडचणीत मिळणे शक्य आहे.
व्यक्त व्हा.. आणि व्यस्त रहा..
- योगेश अडकिणे
Atishay sundar
ReplyDelete