हरवण्यातले सावरणे. भटकंती.

*मी तरुण आहे म्हनून...*

नमस्कार! ����

मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, उद्याच्या इंजिनियरानो ... आणि भारतीयांनो..

मी, एक भारतातला तरुण तडफदार गरम रक्ताचा नवखा मार्केट मध्ये लौन्च होणारा भावी इंजिनियर.!!

कागदाची डिग्री तर भेटेल पण त्यात काय ते कळतच नाही म्हणून.. दिशाहीन तरुण.

शेजारी पाजारी, नातेवाईक, ओळखीचे, नाव माहित असलेले माणसे पाहून आई-वडिलांनी माझ्या भविष्याची काळजी, म्हणून मला शिकवलं, इंजिनियर केले.

त्यांनी त्याचं कर्तव्य पूर्ण केले पण त्यात मला *का इंजिनियर.?*

हे अजून तरी कळलच नाही. आणि मी इंजिनियर देखील झालो.!!

कधी कधी एकट्यात वाटत मी या शिक्षणाच्या दलदलीत माझ्यातल्या मलाच हरवून बसलो. आणि ते चिखल साफ करण्याची मरमर म्हणजेच आयुष्याच ध्येय.
सहजपणा, नैसर्गिकपणा गायब होऊन माझ्यात दुसर्याने बनवलेली दुनिया इन्स्टाल झाली आणि त्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि रामच(RAM) हरवला. कि फुल झाला.??

हि माझीच गोष्ट नाही माझ्यासारखेच कित्येक जन आहेत येथे या दुनियादारीत.

आपला भारत देश आणि मी आम्ही दोघेही आज तरुण. मनात आले तर जगावर राज्य करू. हि आमच्या दोघांचीही ताकद.

माझा तरुण देश धर्म, जात, जुन्या परंपरा, जुना मोठेपणा, गरीब, श्रीमंत, खेडे, शहरे, यांच्या चक्रात अडकून बसलाय त्याच स्वप्न आहे विकसित आणि प्रगत देश, महासत्ता होण्याचे.

आणि मी शिक्षण, नोकरी, पगार, लग्न, नातेवाईक यांच्या इच्छा, अशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या चक्रात अडकून बसलोय.
आणि माझ स्वप्न प्रगत आणि पैसेवान जीवन.

देशही त्या चक्रातून मुक्त होत नाही आणि मी सुद्धा.
आणि म्हणून मी हि हरपलो आणि देशही.

आमच्या दोघांच्या भेटी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि थियेटर मध्येच होतात आणि कधी कधी क्रिकेट च्या मैदानावर.

याव्यतिरिक्त फेसबुक आणि व्हात्साप्प चे देशभक्ती चे संदेश पाठवून आम्ही लिव इन रिलेशन मध्ये आहोत.

तरुण आम्ही.. कशासाठी आहोत? कोणासाठी आहोत?

लाथ मारीन तिथ पाणी काढू इतकी ताकद आहे. तेच वय आहे.
देशात आणि माझ्यातही.

परंतु, प्रश्न आहे तो लाथ मारून पाणी काढणारा पाय कुठे ठेऊ.??गोंधळ सगळा.!!

या गोंधळात आम्ही तरुण म्हणजे...
मोर्चे काढण्यासाठी असलेली गर्दी.
राजकारणी लोकांची आंदोलने करण्यासाठी असलेली सामग्री .
राजकीय पक्ष, संघटनचे कार्यकर्ते आम्ही तरुण.

बैनर वर असलेल्या नेत्यांचे, साहेबांचे निष्ठावंत, समर्थक, कोणाचा डावा हात तर कोणाचा उजवा हात.. म्हणजे आम्ही तरुण.

आम्ही कोटीमध्ये असुन स्वप्न नसलेले बेरोजगार, फक्त डिग्री असणारे उच्चशिक्षित अडाणी पदवीधर. कागदी घोडे.!!

आम्ही तरुण गर्दीत गेलो कि मर्द होतो आणि एकट्यात स्वतासोबत लढतो.

कॉलेज मध्ये मास्तर बोलत नाहीत, घरचे म्हणतात आता तू मोठा झाला तुझ तुला समजायला पाहिजे.
या समजून घेण्याच्या शिक्षनाने  दलदलीत जीवन केलय. सगळा गोंधळच, बाजार!
स्वप्नांचा गुंता म्हणजे आम्ही तरुण इंजिनियर.
स्वताचे अस्तित्व टिकवण्याचा आटापिटा म्हणजेच आमच जीवन.
पैसा म्हणजेच अस्तित्व. हेच आमच स्वप्न आणि ध्येय.

त्या पैस्याच्या मागे लागताना वाटेत धर्म येते, जात येते, गाव येते, राजकारण येते आणि मग पुस्तकी आधार घेऊन कोणाचे तरी गुलाम होण्याकरिता कंपनीच्या दारात, परिक्षेच्य दारात भिक मागतो आणि मरतो आणि मारतो स्वतालाच.

इंजिनियर होता होता काय काय होते तेच कळत नाही. सगळे निघाले म्हणून कळपात सामील होण्याकरिता दारोदार भटकंती सुरु राहते.
त्या भटकंतीत कळते शिक्षणाने लुळेपांगळे करून सोडले आहे.

या लुळे पांगळे पणात कोणीही येते आणि आम्हाला ओरबाडून जाते.
म्हणून मला माझ्यासारख्या तरुणांना प्रश्न पडतो, पाणी काढणारी लाथ कुठे मारावी ?? ती जागाच नाही भेटत!!

हे कळत नसल्यामुळे दुसऱ्यांनी बनवलेल्या डोक्याचा मी इंजिनियर होत आहे.
ती माझी इंजिनीअरिंग नवनिर्मितीसाठी नाही. ती आहे फक्त जगण्यासाठी.
म्हणून माझे आपले हे जीवन वर बसलेले हे आणि ते दोन्ही लोक दारूगोळ्या सारखा वापर करतात आणि आपण मी हरपून जातो त्यात.

तरुण आणि भारत हे दोघेही भटकत आहेत.... हरवण्या पूर्वीच सावरणे.!!��������

*- योगेश अडकिणे.*

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार