आमचा कट्टा गेला...

THE END
कित्येक आठवणींचा साक्षीदार आज आमच्यात नाही... मेकचा कट्टा गेला..

हिच ती जागा,
जिथे आमची ओळख झाली.
मोकळेपनाने वागायला शिकलो, हसायला शिकलो, नाचायला शिकलोत.
युद्ध, वाद, भांडण, लफडे सगळ्यांच्या हक्काचा आश्रय कट्टा.

कित्येक गोष्टी जुळल्या, बिघडल्या त्या येथेच.

अभ्यास , असाइनमेंटची शाळा येथेच भरायची.

गप्पा, मस्ती, टिंगल टवाळी येथेच व्हायची.

पिचर मधल्या सारखे मनाचे गाणे येथेच वाजलीत.

कोण हिरो तर कोणी हिरोइन येथेच घडलेत.
विलन चा अवतार सुद्धा कित्येक जणांना याच जागेवर पहायला मिळाला.
शाबासकीची थाप कट्ट्यानेच दिली.

मुव्हीचा प्लान, पार्टीचे नियोजन येथेच ठरायचे.
बड्डे सेलिब्रेशन्स, जीपीेएल याच जाग्यावर.

एकाच डब्यात सर्वजन जेवणार, तुटून पडणार.. डब्बे चोरी प्रकरणे येथेच घडलीत.
घरचे जेवन फक्त कट्ट्यावरच भेटायचं.

नविन कल्पना, जागतिक विचार सगळ सगळ कट्ट्यावर गेल कि भेटायचं.

राजकिय, सामाजिक विषयांवरती चर्चा रंगल्या त्या येथेच..

स्पोर्ट्स वीक, गैदरिंग, बाकी इव्हेंटस चा आनंद कट्ट्याशिवाय नाहीच.

मनातल्या गोष्टी पानात रंगल्या त्या कट्ट्यावर बसुन.
कितीतरी जोड्या जुळल्या त्या कट्ट्याच्या सावलीत.

थंडगार सावली, पावसाचा आनंद कट्ट्यावर बसुनच... काॅलेज च्या श्वानांना देखील तिथे माणसाच प्रेम मिळायच ते कट्ट्यावरच.

सगळ्यांचा आवडता फोटो प्वाइंट.. कट्टा.
गैदरिंग च फोटो सेशन या कट्ट्याच्या सावलीत व्हायचं, नवनवीन पोजांचा शोध कट्ट्यावरच लागला.

खरी इंजिनियरिंग तर कट्ट्यावर बसुनच झाली.
आज तीच जागा गेली. :-/
इंजिनियरिंग ने जे काही दिल ते कट्ट्याशिवाय अपूर्णच.

कित्येक आठवणींचा साक्षीदार, आधार, आज गेला..
यानंतर कट्टा आमच्या सोबत फक्त फोटोतच दिसणाप. फक्त आठवणी मध्येच त्या गोष्टी रहाणार...

भावपूर्ण श्रद्धांजली.
# वर्कशॉप पार्किंग,
# मेक कट्टा,
# इलेक्ट्रीकल कट्टा.

Where we become Friends for life.

Fact is, "We can close our eyes to reality, Not to memories."
Katta will only be in memories, in stories not in real. It's fact.

#RIP GECA WORKSHOP PARKING.
#RIP MECH_KATTA. & Electrical Katta.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार