स्वातंत्र्यप्रती असलेले मनातले प्रश्न.

स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला आणि २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले; असे लहान पणापासून ऐकले आणि नंतर पुस्तकात वाचले आणि आज तोंडपाठ आहे. कित्येकदा ऐकून, साजरा करून, वाचून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी डोक्यात फीट बसले आहे. मरेपर्यंत विसरणार नाहीच. पण, मला अजून समजलेच नाही “नेमका भारत काय स्वातंत्र्य झाला..?? का झाला..?? कशासाठी झाला..?? आणि कोणापासून झाला..??” “कधी झाला.?? आणि कोणापासून झाला..?? याचे उत्तर आहेत... १५ ऑगस्ट १९४७ आणि इंग्रजापासून.” हे पण इतिहासाच्या पुस्तकातल्या गोष्टी आणि मोठ्या माणसांच्या गोष्टी/भाषणातून ऐकलेला तेवढाच समजला आणि तसाच स्वातंत्र्याचा अर्थ माहिती आहे. बाकी शून्यच!! लहानपणीचे शाळेचे दिवस.. त्यातील झेंड्याचा दिवस.. रात्री हातावर मेहंदी.. आणि सकाळी लवकर उठून शाळेत जायचं.. झेंडावंदन.. राष्ट्रगीत.. नंतर गावाने निघालेली प्रभातफेरी. त्यात एखाद्या चौकात गाव पुढार्यांनी दिलेल्या चोकलेट, संत्र्या गोळ्या चघळत दिलेले भारत माता कि जय.. वंदे मातरम.. एक रुपया चांदी का.. इन्कलाब जिंदाब...