Real Hero- Bhaskar Pere

आयुष्यभर कधीच न संपणारी शिदोरी.!! - आजचा दिवस.
---------------------------------------------------------------
गावात काय आहे..??  खेड्यात काय आहे..??  तिथली लोकं काय सुधरणार... अडाणी, अशिक्षित रिकामटेकडी.!!
असं आपल्या डोक्यात शहरात राहुन वाटत.. आपली जीवनशैली अन् त्यांची..??
पण, हे सगळ खोट ठरतं औरंगाबाद जवळील पाटोदा गावात गेल्यानंतर..

एक चांगल काम.. एक विचार किती बदल घडवतो हे दाखवुन दिल.. भास्कर दादा पेरे यांनी.
एकदम साधा.. आपल्या भाषेत येडा गबाळा माणूस.. शिक्षण फक्त 7 वी पास.!! तरीही,.. तब्बल 20 देशांची भ्रमंती करून त्या देशाचा अभ्यास करणारा माणूस.!!
गावाचा सन्मान वाढवनारा माणूस.. राष्ट्रपति डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रतिभा ताई पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून देणारा माणूस.!!

शहरात राहणा-या माणसाला "खेड्याकडे घेवून येणारा."

संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन... आज तोच एक कित्येक जणांचा प्रेरनास्थान झाला आहे .

#विशेषता :
✒️ मोफत पिठाची गिरणी गावचा महसूल वसूल करुन देते.
✒️ गावात सतत विविध गावातुन, शहरातुन, वेगवेगळ्या राज्यातुन आलेले.. पर्यटक, अभ्यासु, पत्रकार, विद्यार्थी यांची रेलचैल सुरु असते.
✒️ प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय शहरातील कार्यालयास लाजवेल.
✒️ "पुर्ण वेळ सरपंच".. फक्त पत्रिकेवर असणा-यांपैकी नाही .
✒️ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी गाव स्वच्छ ठेवण्याच काम करतात.
✒️ गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे वाढदिवस साजरे केले जातात.
✒️ स्वच्छ आणि निर्मळ पाणी पुरवठ्यासाठी.. आधुनिक पाणी पुरवठा योजना.. Swiping Card (ATM type ).
✒️ स्मशानभूमी ते पण प्रशस्त.
✒️ संपूर्ण गाव Solar System युक्त.
✒️ गाव आणि जिल्हा परिषद शाळा CCTV च्या नजरेत.
✒️ कार्यालयीन कर्मचारी व सदस्य यांच्या तर्फ अतिशय सन्मानाने वागणूक दिली जाते.
✒️ गावचा संपूर्ण Record. Computerized करण्यात आलेला आहे.
✒️ लोकसंख्येपेक्षा तिप्पट झाडे.
✒️ कित्येक मान्यवरांनी गावला भेटी दिलेल्या आहेत.. सिनेमा जगत, राजकिय, प्रशासकीय अधिकारी.

खुप काही आहे गावात...
"खरा भारत, तिथेच आहे ."

#धन्यवाद :
YouTube, Google, दिव्या मराठी आणि Team.

Salute To Real Hero. - Bhaskar Dada Pere Patil.

---------------------------------------------
लेख त्यांच्यासाठीच ज्यांना.. आपल्या मातीच स्वप्न आहे.!!

Comments

  1. We need many more such people around. We have seen d fate of those who have so much by unfair means and suffering in life. I practice lots of social activities in my own way. There is immense joy n gud health.

    ReplyDelete
  2. I could not stop hearing him for more than one an hour. He is one he term himself but most literate among us. Amazing. BhaskarBhau, Keep it up. Society need people like you. You give solution to every problem. You practice what you preach.

    ReplyDelete
  3. Salute real Hero...... Bhaskarrao Pere Patil🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार