असं पाहिजे माझं गाव...

आयुष्यभर कधीच न संपणारी शिदोरी.!! - आम्हाला पाहिजे असलेले गाव . ____________________________________
गावात काय आहे..?? 
खेड्यात काय आहे..?? 
तिथली लोकं काय सुधरणार... अडाणी, अशिक्षित रिकामटेकडी.!! 
असं आपल्या डोक्यात शहरात राहुन वाटत.. आपली जीवनशैली अन् त्यांची..?? 
पण, हे सगळ खोट ठरतं औरंगाबाद जवळील पाटोदा गावात गेल्यानंतर..
एक चांगल काम.. एक विचार किती बदल घडवतो हे दाखवुन दिल.. भास्कर दादा पेरे यांनी. 
एकदम साधा.. आपल्या भाषेत येडा गबाळा माणूस.. शिक्षण फक्त 7 वी पास.!!
तरीही,.. तब्बल 20 देशांची भ्रमंती करून त्या देशाचा अभ्यास करणारा माणूस.!! 

आम्हाला ते विचारतात, "तुम्ही इंजिनियर लोकं आहात ना.?? मला सांगा बिना हाॅर्न ची गाडी चालवता येत का तुम्हाला.?? तुमच्या मागुन कोणी हाॅर्न वाजवत असेल तर ते तुम्हाला शिवी देतय.." हे अस सांगत ते म्हणतात, "ज्या देशात बिना हाॅर्नच्या गाड्या धावतात तो देश प्रगत. जेंव्हा आपले हाॅर्न बंद होतील तेंव्हाच आपन प्रगत आणि जे इंजिनियर लोकं हे करतील तेच खरे हुशार इंजिनियर.. बघा तुम्हाला जमत का हे."
हे असे बोलुन गावाचा सन्मान वाढवनारा माणूस..
राष्ट्रपति डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रतिभा ताई पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून देणारा माणूस.!! 
शहरात राहणा-या माणसाला "खेड्याकडे घेवून येणारा."
संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन... आज तोच एक कित्येक जणांचा प्रेरनास्थान झाला आहे .

#विशेषता : 
✒️ मोफत पिठाची गिरणी जी संपूर्ण गावचा महसूल वसूल करुन देते. 
✒️ गावात सतत विविध गावातुन, शहरातुन, वेगवेगळ्या राज्यातुन आलेले.. पर्यटक, अभ्यासु, पत्रकार, विद्यार्थी यांची रेलचैल सुरु असते. 
✒️ प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय शहरातील कार्यालयास लाजवेल. मोठे पटांगण, कार्यालयासमोर, तिथे आठवडी सभा होतात.
✒️ "पुर्ण वेळ सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक.".. फक्त पत्रिकेवर असणा-यांपैकी नाही . 
✒️ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी गाव स्वच्छ ठेवण्याच काम करतात. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मार्फत गाव स्वच्छता अभियान राबवले जाते. दररोज शाळेतील विद्यार्थी विभागवार काम करतात. ते पण, नियमित एक तास. स्वच्छता स्पर्धा आणि त्याचे गुण असतात.
✒️ गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे वाढदिवस साजरे केले जातात. ग्रामपंचायत कार्यालयातील सुचना फलकावर शुभेच्छा संदेश आणि भेटवस्तू ते ही नियमितपणे.
✒️ स्वच्छ आणि निर्मळ पाणी पुरवठ्यासाठी.. आधुनिक पाणी पुरवठा योजना.. RO System. (ATM type ). 
✒️ स्मशानभूमी ते पण प्रशस्त. अगदी बगीचा. (स्मशानभूमीत आम्ही फोटो सेशन केले.)
✒️ संपूर्ण गाव Solar System युक्त. सौर चुल, Solar Heaters, Solar Straight Lights.
✒️ गाव आणि जिल्हा परिषद शाळा CCTV च्या नजरेत.
✒ संपूर्ण हगनदरीमुक्त. (यांमुळे महिलांचा भेटण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हगनदरीमुक्तीमुळे घराबाहेर बंद पडले होते.. त्यामुळे महिला वर्गाच्या भेटीगाठी कमी झाल्या. महिलांना बोलायला नाही भेटायच. यांवर खुप छान पर्याय गावाने काढला तो होता सार्वजनिक धोबी घाट. कपडे धुण्याच्या निमित्ताने महिलांचा गप्पा गोष्टींची समस्या सोडवली गेली.)
✒ धोबीघाट गाव गल्लीनुसार.
✒ सार्वजनिक नळांना लाॅक सिस्टीम. जेवढी गरज तितकच पाणी घ्यायच. अधिकचे घेतले तर त्यावर दंड वसूल करण्यात येतो.
✒️ कार्यालयीन कर्मचारी व सदस्य यांच्या तर्फे सर्वांना अतिशय सन्मानाने वागणूक दिली जाते. 
✒️ गावचा संपूर्ण रेकाॅर्ड संगणकिकृत करण्यात आलेला आहे. 
✒️ लोकसंख्येपेक्षा तिप्पट झाडे. 
✒️ कित्येक मान्यवरांनी गावला भेटी दिलेल्या आहेत.. सिनेमा जगत, राजकिय, प्रशासकीय अधिकारी. खुप काही आहे गावात... "खरा भारत, तिथेच आहे ."

#धन्यवाद : YouTube, Google, दिव्या मराठी आणि आमची ध्यास TEAM, GECA . ज्यांच्यामुळे हे गाव आम्हाला समजले.

Salute To Real Hero. - Bhaskar Dada Pere Patil. 
---------------------------------------------------------------
लेख त्यांच्यासाठीच ज्यांना.. आपल्या मातीच स्वप्न आहे.!!

---------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार