यांची इतिहासाला व भविष्याला दखल घ्यावी लागणार..(25/6/17)
*बिगुल वाजला.*
अभियांत्रिकी महाविद्यलय औरंगाबादने विविध कला, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, या सगळ्याच क्षेत्रात आम्ही (जिकाचे विद्यार्थी) काय आहोत.?? हे काल औरंगाबादकरांना दर्शन दिले... तब्बल 5 तास रसिकांना हरवुन टाकले.. विसरायला लावले आपण कोण आहोत..
बघा, हसा.. रडा.. भावनिक व्हा आणि मधूनच शिट्ट्या येऊ द्या.. अरे बाप.. आय शपथ.. खरच.. कडक.. जिंकल.. आखरी.. अप्रतिम.. कोण आहे राव हे.. त्याला पकडा.. काय चित्र.. आवाज.. सुर..
याच शब्दांचा जप काल यशवंतराव चव्हान नाट्यगृहातील रसिकांना करावा लागला.. आणि तो जप घडवून आणला.. *भावी अभियंत्यांनी!!*
आणि हे घडण्यामागे निमित्त होते.. *नाटक 2.0*. कित्येक वर्षापासूनचे *अभियंत्याच हे स्वप्न..* कि रंगमंच गाजवायचा.. मन जिंकायची.. रसिकांच दुःख, त्रास, अडचणी तेवढ्या काळासाठी दूर करायच्या.. त्यांच्या मनात शिरायच.. वेगळ्या दुनियेत न्यायच.. आणि कायमस्वरुपी त्यांना जिंकायच.. हेच *ते स्वप्न*.. प्रत्येक्षात आणलेच सोबत.. *मराठवाड्याचा, औरंगाबादचा, आणि आमच्या जिकाचा रंगमंचावरचा पाया मजबुत केला.*
सर्व प्रकारच्या कला क्षेत्रात आम्ही येणार आहोत.. आलोत.. आणि जग जिंकणार हे कालच सिद्ध केलय.
मुंबई आणि पुणेकरांनो सावध रहा.. आलोत आम्ही.
आम्ही म्हणजे.. थोड लेट पण ग्रेट. कारण, आम्ही म्हणजे एकदा जिंकलेली जागा सोडतच नाही. हे आमची वैशिष्ट्ये...
लेखक.. दिग्दर्शक.. यांची काही स्वप्न असतात.. ज्यासाठी कित्येक वर्षापासुन ते मरतात.. एकटे पडतात.. त्यांचा एकच ध्यास.. मनातल लोकांपर्यंत गेल पाहिजे.. ही एवढीच अपेक्षा. त्यासाठी सगळा उठाठेव...
एका आमदाराला वाटत कि मी देखील तिथे जाव त्यांच्यासोबत असाव.. नेक्स्ट टाईम मला तुमच्यात घ्या ही विनंती करावी लागते ही ती दाद.. हे ते सन्मानपत्र.
महाराष्ट्र गाजवणारे गायक म्हणतात, "तुम्ही आमच्या सोबत चला, आम्हाला तुमची गरज आहे." हे ते मन जिंकणे. (पारख,दर्दी)
एक अभिनेता, दिग्दर्शक, सल्ला देतात, विनंती करतात, "तुमच्या पाल्याला अभियांत्रिकी करताना एक महिना द्या.. त्याला इक्झाम पेपर नाही आठवणार.. त्याला त्याची कला आठवणार.. आणि या वयात केलेल्या चुका.. आणि ह्याच चुका त्याला उद्या समाधान आणि आनंद देणार." (काळजी, समाधान.)
आणि लेखक म्हणतो, "मला जे काही सांगायचं होतं ते या कलाकारांच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगून झालेलं आहे." (शब्द पकड.)
जिकाच्या कलाकारांना.. दंडवत.. मुजरा.. शुभेच्छा.. तुमच्या मुळे पुन्हा एकदा अभिमान वाटला.. नशिबवान आहोत हे कळाल.
*जिंका.....*
Comments
Post a Comment