Engineering.
आजची आमची इंजीनियरिंग.
न कळत कुठुन हा प्रवास सुरु झाला..
वाचत, लिहीत, ऐकत, पुस्तकांना समजुन घेत कधी आम्ही.
किती विषयात शिरलोत आणि त्यातून खूप काही शिकलो.. समजल सुद्धा नाही.
काय, किती शिकलोत याची उजळणी करताना त्या सुरुवातीच्या शूण्यापासुन सुरु केलेला हा प्रवास आठवला आणि आता कुठे आहोत.
याचा जेंव्हा विचार करतो तेंव्हा खूप लांब चा पल्ला गाठला अस लक्षात येते.
या प्रवासात खूप धक्के खालेत.. बसलेत.. Stop मिळालेत..
शिक्षकरुपी, मित्ररुपी, मेस वाल्या काकांपासुन ते घर मालक, Seniors, Juniors..
असा विचार केला तर साधारण 5 इंजीनियरिंगच्या पिढ्यांना भेटण्याचा योग येतो याच प्रवासात.
तरी, Events, Social media, आण guest रुपी मिळणारे प्रवासी. तर वेगळेच..!!
कित्येक प्रवासी मिळाले.. त्याच प्रवांशामुळेच हा प्रवास सुखद वाटतो.
आपली इंजीनियरिंग.. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणारी.. मनात अण् डोक्यात काही दाबून ठेवणारी नाही.
वेगवेगळ्या माध्यमातून आनंद घेते, त्रास देते, बोलते.. हसती-खेळती खोडकर इंजीनियरिंग आहे.
सोशल मेडिया ने तर आपल्यालाच त्या प्रीती झिंटा सारखी गालावर खळी आणि अलका कुबल सारखं रडु कधी, कस आणायचं ते नकळत कधी शिकवल समजल सुद्धा नाही.
किती धिंगाणा, गोंधळ, मस्ती, उनाडक्या असतात आपल्या Whatsapp, Facebook, Hike वर.
आपणच ते नशीबवान आहोत.. साक्षीदार आहोत..
आब कि बार मोदी सरकार..
आरं, कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र..
आठवलेंच्या कविता,
काहीही हं श्री..
क्रिकेट मैच झाली कि उडवणारे आपणच
अशा प्रत्येक गोष्टीत आनंद शोधनारे आपणच.
याच Online दुनियेत आपल्याला मित्र भेटले, मैत्रीनी भेटले, मार्गदर्शक भेटले.. जीवनसाथी भेटले.
सेकंदात किती तरी अडचणी दुर होतात या ठिकाणी तर कधी सेकंदात अडचणी निर्माण होतात. लगेच दूस-या क्षणी आपण त्या वेगवेगळ्या माध्यमातून दूर करतो.. जादुई नगरी आहे ही Online दुनिया.
इंजीनियरिंग ची करामत ही..
एक व्यासपीठ भेटल आपल्याला.. सुख आणि दुःख वाटुन घेण्याच.
आज आपण डोक्यासोबतच बोटावर समस्त जगाच विद्यापीठ घेऊन फिरत असतो. खुप अपडेट झालोत..
घराची, गावाची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची या सर्व सीमा आपन तोडुन टाकल्यात.
या सगळ्या गोष्टीचा एकत्र विचार केल कि लक्षात येते.. इंजीनियरिंग ही आता.. Mechanical, Electrical, Civil, Computer, IT, Electronics या कोणत्याच डिपार्टमेंट पुरती मर्यादित राहिली नाही.
" Social आणि Global इंजीनियरिंग" आहे आपली.
येथेच याच प्रवासात आपल्याला कित्येक कलाकार, खेळाडू, नेते, विद्वान, किर्तीवान, अधिकारी भेटतात. जे पुढी चालुन आपलं या प्रवासातल्या आठवण रुपी शिदोरीतून मार्गदर्शन करणार, समजुन सांगणार..
पुन्हा एकदा हा प्रवास पाहिजे असचं वाटणार त्या वेळेस.
किती साठवन आहे आपल्याकड आठवणींची अण् शिदोरीची..
आपण सर्व जण फोटोशाहीचे राजे आहोत.
जाणार तिथे सेल्फी आणि पोजा होणार आमच्या..
प्रत्येक क्षण आपण जिवंत ठेवला आहे.
फ्रेशर्स पार्टी, Birthday Celebration, Traking, Submission, Long Drive, Gathering, गणपति डान्स असो वा Common Off, Group ने गेलेला Movie असो..
Whatsapp ग्रुप वर केलेला गोंधळ सुद्धा आपण Screenshot घेऊन जिवंत ठेवला आहे.
ही सर्व मजा-मस्ती, गोंधळ, धिंगाणा घालत असतानाच.. Project, Submission, Presentations, Vivos, Exams आणि त्यांच Late Night Preparations या सगळ्या गोष्टीतून भविष्यातील येणा-या अडचणीवर कशी मात करायची आणि पुढे चालायचा शिकवल.
आईवडील, नातेवाईक जूणे मित्र यांना सोडुन केलेला हा प्रवास.
ज्यातूण आपल्याला ..
एक ताकद, कित्येक अनुभव, वेगवेगळे चेहरे, मानसं, मित्र, आनंदी क्षण, खूप गोष्टी आहेत. जेे आपल्याला भेटल्यात..
जेंव्हा हा इंजीनियरिंग चा प्रवास संपेल आणि नविन दुनियेत प्रवास करु तेव्हा ही आठवणींची शिदोरी मनाला हसवेल, खेळवेल आणि कधी रडवेल समजणारं सुद्धा नाही.
शूण्यापासुन सुरुवात केलेला हा प्रवास अजुन खुप लांब घेऊन जाणार.. एक च्या पुढे असलेला तो शून्य आणि नंतर किती अंक येणार.. मोजता नक्कीच येणार नाहीत.
तेच शेवटचा शून्य शोधायचा आहे आपल्याला.. म्हणून हा इंजीनियरिंग प्रवास.!!
शिदोरी जपून ठेवा आणि मिळुन खा.. कधीच संपनार नाही.. प्रत्येकाला वाटा.. खुप गोड लागेल.. समाधान मिळणार..
जय सोशीओ इंजीनियरिंग.!!
Comments
Post a Comment