Baja स्नेहमीलन.
“जिका च्या SAE परिवाराची वार्षिक स्नेहमिलन व आढावा बैठक संपन्न.”
दि. १ एप्रिल २०१८, रविवार रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथील Classroom Complex सभागृहात वार्षिक स्नेहमिलन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. निमित्त होते IIT Ropar येथे संपन्न झालेल्या “BAJA SAEINDIA’2018” या स्पर्धेत महाविद्यालयाच्या “Team Aryans” संघाने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेतील “सर्वोच्च द्वितीय स्थान” पटकावले होते, संघ यावेळेसच्या स्पर्धेत उपविजेता आहे. या सोबत वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम स्थानावर आहे. त्यात रफ्तार अवार्ड, सर्वात कमी वजन, एक्सलरेषण या स्पर्धेत संघ विजेता ठरला.
सर्व कामगिरी चा आनंदोत्सव सोहळा व पुढील दिशा कशी असेल या करिता विजेत्या संघातील सदस्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संघातील सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी “SAE परिवारातील” आजी माजी सदस्य उपस्थित होते. कार बनवण्यासाठी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष रित्या मदत करणारे मान्यवर उपस्थित होते. पालक देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षक, प्राध्यापक यांची अनुपस्थिती माजी विद्यार्थ्यांकरिता कुतूहलाचा विषय ठरला. कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थित राहायला हवे असा मनोदय व्यक्त केला गेला. शिक्षकांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असते आणि त्यातून मनोबल वाढण्याकरिता सकारात्मक परिणाम संघाच्या एकूण कामगिरीतुन दिसून येतो.
यावेळी संघाची आज पर्यंतच्या प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली, त्या मध्ये पहिल्या २०१० पासून ते आज २०१८ पर्यंत SAE परिवाराने कशी प्रगती केली, त्यांनी बनवलेल्या गाड्या, प्रत्येक संघाच्या काम करताणाच्या फोटो यांच्या माध्यमातून वाटचाल दाखवली
काय अडचणी आल्या होत्या, मुलांनी त्यावर कशी मात केली, कोणी मदत केली, त्या त्या वेळेसची शिक्षकांची भूमिका, कॉलेजची भूमिका, यासारख्या विषयावर चर्चा झाली. आजी माजी विद्यार्थ्यांचे योगदान जाणीव ठेवून “विशेष योगदान” असे प्रमाणपत्र देऊन उपस्थित सर्व माजी सद्स्यांचा सन्मान करण्यात आला.
पुढील सत्रात, उपस्थित असलेल्या मान्यवरांनी जुने अनुभव मनोगत व्यक्त केले. “Team Aryans ची सुरुवात कशी झाली.? त्या मागची कल्पना काय.? त्यातून मुलांना काय मिळाले.? महाविद्यालयांना काय मिळाले.? पुढील आयुष्यात “Team Aryans” मध्ये केलेल्या कामाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होत आहे.? गरज काय आहे.? कोणत्या अडचणी आल्या.? कोणत्या परिस्थितीशी सामना करत प्रवास केला.? आज आपण दुसर्या स्थानावर आहोत तर, पहिले स्थान का नाही मिळाले.? महाविद्यालयाकडून अपेक्षित सुधारणा, साथ.? वर्कशॉप ची परिस्थिती, आणि तिथे आवश्यक बद्दल, सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याकरिता हवी असलेली मदत, ती कुठून मिळवायची.? या सारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रातिनिधीक काही सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यापैकी खालील काही व्यक्ती,
चंद्रशेखर बोंगाणे यांनी, (हे उपस्थित मान्यवरात सर्वात जुने सदस्य “Team Aryans” च्या आजपर्यंतच्या प्रवासाचे एकमेव साक्षीदार, मार्गदर्शक.) तेंव्हाची गाडी आणि आजची गाडी यावर नजर टाकली. सोबत गाडीचा चालक व त्याची भूमिका याबदल अधोरेखित केले, महत्वाचे म्हणजे “बहा ने तुम्हाला काय दिले,” हे विचारत “मला काय काय दिले.” हे सांगितले.
प्रिया पाटील यांनी, महाविद्यालयाची माजी विद्यार्थी, संघाची माजी सदस्य तसेच सध्या MAHINDRA SAE सोबत काम करत असताना बहा मध्ये केलेल्या कामाचा उपयोग कसा होत आहे हे सांगितले. संघाला कश्या पद्धतीने मदत करता येऊ शकेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
रुपेश जाधव यांनी, योगेश्वर डाबरिया व त्यांच्या मित्र परिवारांनी “बहा पुन्हा का सुरु व्हावे.?” या मागची संकल्पना स्पष्ट करत “कशी झाले.” हे सांगितले. त्याच सोबत शासकीय सेवेत काम करत असतान “बहा” मध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग कसा होत आहे हे सांगितले.
धनंजय नरमला सरांनी, आर्थिक नियोजन कसे करावे, येणाऱ्या अडचणी व सांघिक कामगिरी यांचा समतोल साधत मिळालेले यश कसे टिकवता येणार ह्यासाठी कोणते प्रयत्न केले जावेत ह्या संदर्भात माजी विद्यार्थी, मित्र व प्राध्यापक या नात्याने कमी शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रतिक वाघमारे यांनी, गाडी बनवण्यासाठी आणि बनवलेली गाडी अजून उत्कृष्ठ कशी बनवता येयील यासाठी तांत्रिक अंगाने चर्चा घडवून आणली. त्यांच्यावेळेस IIT TECHFESTमध्ये प्रथम आलेले अनुभव कथन केले. सोबत “विद्यार्थी बाहा चा अनुभव घेऊन एखाद्या विषयात निष्णात कसे होत जातो.” यावर सोप्या भाषेत चर्चा केली.
पुष्कर मुनगीकर यांनी, बाहा बद्दल अनुभव सांगितलाच सोबत अभ्यासक्रमातील आवश्यक बदल यासंदर्भात देखील सांगितले. विदेशात जाण्यासाठी आवश्यक तयारी, लागणाऱ्या गोष्टी, आणि काळजी यावर विस्तृत चर्चा केली.
विनीत विश्वकर्मा यांनी, कमीच शब्दात अविस्मरणीय प्रसंग सांगितले. काम कसे होता आणि कसे केले जाते यावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
तारकेश्वर पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव राजांचा स्वराज्यस्वप्न कसे आणि का पूर्ण झाले, आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते आजही इतके वर्ष का टिकून आहे, सर्वाना आदर्श का आहे हे समजून सांगत “Team Aryans” च्या “जीकाच्या जिंकण्याच्या स्वप्नाची” कथा कशी प्रतेक्षात आली हे समजून सांगितली. आणि हे सांगताना विजयाचे स्फुलिंग सतत तेवत राहण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्या यासाठी प्रयत्न केले जावे यासाठी देखील मार्गदर्शन केले. त्या सोबतच महविद्यालयाने कोणती मदत करायला हवी, आजपर्यंत काय प्रतिसाद मिळाला यावर देखील विस्तृत उहापोह करण्यात आला.
मंगेश फंड यांनी, आपल्या सातारी भाषेत प्रवास सांगितलाच सोबत अपेक्षा व्यक्त करत चुका होऊ नाही या करिता कडक शब्दात आजी आणि माजी सदस्यांना आपल्या शैलीत प्रेमळ शब्दांत समजून सांगितले. इतर महाविद्यालय व आपले महाविद्यालय तसेच तेथील मुले आणि आपले मुले यांचा तुलनात्मक फरक आणि शक्तीस्थाने कोणती हे सर्व सदस्यांना दाखवून दिली. सोबत आर्थिक आढावा घेत काय आवश्यकता आहेत, त्या मिळवायच्या कोणत्या पद्धतीत हे प्रश्न सध्याच्या संघाला केले,यावेळेस “Team Aryans” अंतरराष्ट्रीय स्तरावरील SAE स्पर्धेत प्रथमच भाग घेणार आहे, त्या अनुषंगाने आवश्यक विषयांवर चर्चा करून मार्ग कसा काढता येऊ शकेल यावर सर्व सद्स्यसोबत जाहीर चर्चा केली.
संकल्प महामुनी यांनी, २०१५ च्या संघाचा कर्णधार म्हणून अतिशय थोडक्या शब्दात मार्गदर्शन करत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
योगेश अडकिणे यांनी,, बहा मध्ये काम करत होते ते आणि करत आहेत त्या मित्राबद्दल मत व्यक्त करताना “जिंकलेल्या जिकाची काल्पनिक वाटणारी ‘एकाच स्वप्नाची सत्य कथा.” जुन्या, पाहिलेल्या घडामोडी आठवत प्रसंग जागे केले. तसेच “SAE SUPRA” सदस्य, प्रतिनिधी म्हणून जीकाच्या पहिल्या SAE SUPRA ची सुरुवात, प्रवास, अनुभव, याबद्दल बोलताना “SUPRA का सुरु झाली आली आणि का बंद पडली.? यावर प्रकाश टाकला. आणि आज ती ‘SUPRA’ पुन्हा नव्याने सुरु करण्याचे आवाहन केले. सोबत महाविद्यालयाचे आजपर्यंत SAE चे सदस्य असणारे किमान २०० सदस्य आहेत त्यांनी संघाला व महाविद्यालयाला कोणत्या पद्धतीत मदत करता येऊ शकेल यावर विचार करावा. ज्याचा लाभ सर्वाना होईल.
अमेय बोरडे यांनी, अतिशय महत्वाच्या ज्वलंत विषयावर हात घातला. “महाविद्यालय व SAE यांच्या मध्ये MOU करून संघामध्ये काम करणाऱ्या मुलांना प्लेसमेंट मिळावी यासाठी देखील प्रयत्न केले जावेत.”
२०१८ च्या संघाचा कर्णधार अजिंक्य उरगुंडे यांनी, संघाची कामगिरी व सध्याची परीस्थिती सादर केली. कर्णधार आणि संघ या बद्दल जास्त लिहिण्याची अवश्यकता नाही कारण वर जे काही लिहिले आणि लिहिण्याचे जे कारण आहे ते संघ आणि कर्णधार.
कार्यक्रम समारोप प्रसंगी आज अनेक प्रश्न आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. जे प्रश्न 2011 च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केले तेच 2017 च्या विद्यार्थ्यांनी केले. याचा अर्थ 8 वर्ष्यात वारंवार पाठपुरावा करून काहींच बदल घडला नाही. उदा. BAJA साठी स्वतंत्र lab, कायदेशीर परवानगी साठी महाविद्यालयातून लागणारी मदत, practical करण्यासठी नसलेले सामग्री इ. या आणि अश्या प्रश्नावरती प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात आला. हे प्रश्न सोडवण्याकरिता काय प्रयत्न करणे आवश्यक आहेत, त्यासाठी कोणते मार्ग आहेत यावर देखील चर्चा झाली. कोणाच्या सहकार्यातून हे सोडवले जाऊ शकतील या करिता सविस्तर चर्चा घडून आली.
चहापाणी व स्वरुची भोज यांचा आस्वाद घेत स्नेहमिलन व आढावा बैठक या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जिकाच्या पहिल्या गाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. गौरव कुलकर्णी, देवदत्त चौसळकर आणि ती बॅच व त्यांचे सहकारी यांची आठवण काढण्यात आली तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व सहकारी यांना देखील धन्यवाद देण्यात आले. जिकाचे माजी विद्यार्थी व BAJA SAEINDIA चे संस्थापक सदस्य असणारे श्री. विनय मुंदडा यांची देखील आठवण काढण्यात आली. व धन्यवाद दिले.
यावेळी प्रजेश(दादा) रोडगे पाटील, पंकज भैया अर्वीकर, प्रदिप गायकवाड, अतुल पहिलवान (उशिरा आले होते.), आकाश अभंग, स्वप्नील शिंदे (गेडाम), निखील फुंदे, सचिन म्हेत्रे, सिद्धांत कांबळे, पंकज रावडी राठोड, शैलेश जुंबाड, ग्यारी रोडगे, हेमंत साळुंके, अमोल अरु पाटील, शुभम आगे, रिशभ गोसावी, कार्तिक चिखलीकर, विडीओ कॉल द्वारे उपस्थित शुभम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अनुपस्थितांपैकी सर्वांची आठवण काढण्यात आली त्यात योगेश्वर डाबरिया, कोमल वानखेडे, रामदास नरवाडे, शारदा माडगुंडी, तुषार शिंदे, शीतल सोनवणे, शुभम जाधव, सोपान आंबरे, चेतन चौधरी, वैभव जोगदंड, शुभम चितोडे, महेंद्र बुक्तार, आकाश साकोळे, सोनाली वेलापूरकर, शुभम स्वामी, पूजा जगदाळे, वैभव कांबळे, पल्लवी शिंदे, दीप्ती पाटील, सोनाली अरोरा, योगेश घोडके, अबोली देशमुख, विभावरी नांद्रे, अमृता पाटील, प्रियांका हराळे, अक्षय सलगर, शिवम भालेराव, साकेत जोशी, अक्षय पवार, किरण अहिरे, निखील बडवे, गणेश कासले, यांच्यासह सर्वांची आठवण काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्या करिता मेहनत घेणारी TeamAryans व त्यांना साथ देणारे विवेक मेश्राम, शुभदा व्यवहारे,प्रियंका लोखंडे, स्तवन कुलकर्णी, योगेश माळी, मोरे, व इतर सर्व. सर्वांचे धन्यवाद व आभार.
GECA SAE, Team Aryans च्या माजी सदस्य जे काही कारणांनी अनुपस्थित होते त्या सर्वांना त्यांच्या योगदानासह, जुन्या आठवणी जाग्या करत खूप खूप मिस केले, उपस्थित सदस्यांनी पुढील कार्यक्रमात सर्वजण येतील हि अपेक्षा करत निरोप घेतला.
“ज्या मातीने चार वर्ष आम्हाला दिले, घडविले तिचे काही तरी देणे लागते, या सर्व सदस्यांच्या सार्वजनिक भावनेतून.!!"
- योगेश अडकिणे.
Comments
Post a Comment