काळ - वेळ - मेळ
जीवन हे नेमकं काय आहे..??
कोणी खेळ, कोणी गाने,
कोणी कोडे, तर कोणी पुस्तक,
आहे असच म्हणतात.
चांगल्या काळाच्या आठवणी आणि येणा-या काळाची आशा हेच आधार आणि सोबत असते जिवंतपणाचा.
कधी कधी या जीवनाचा, जगण्याचा खुप कंटाळा येतो,
पण स्वतः मधील इच्छा आणि जाण्याची उमेद, जबाबदारी साथ सोडु देत नाही.
कोण आपले..?? जगायचं कोणासाठी, कशासाठी या प्रश्नाच उत्तर म्हणजे यश आणि प्रगति.
स्वप्न खुप असतात मोठे मोठे.. पण नेमके ते स्वप्न पूर्ण करायचे कोणासाठी.?? कशासाठी.?? हाच तो प्रश्न जो लवकर सुटत नाही, एखादे वेळेस उत्तर हे प्रश्न पडण्या आधीच सोडल्या मुळे, प्रश्न पडल्या वर उत्तर भेटायला आणि परिस्थिति यायला वेळ हा लागतो.
मग सुरु होते.. आशा, उमेद, प्रतिक्षा योग्य वेळेची सांगड.
मनात आणि डोक्यात खुप छान, सुंदर चित्र असते; कल्पनेतुन खुप छान रंग दिले जातात.
प्रत्येक्षात जेव्हा ते चित्र काढायला हातात घेऊ तेव्हा कळत नेमक्या काय अडचणी आणि प्रश्न असतात..
Comments
Post a Comment