क्रांति होईल का..??

*पाटील तुम्हाला काय कमी आहे..??*

अस म्हणू.. म्हणू.. ऐकून एकजात सगळ्यांनी *मराठ्यांची* जिरवली असच म्हणाव लागल.

मराठा क्रांति मोर्चाने खरच मराठे शाश्वत.. चिरकःल.. निरंतर न संपणारी शिकवण घेतील का..??

गोष्ट मराठ्यांच्या सुशिक्षित लेकरांची..

सुशिक्षित लेकराचा बाप.. शेतकरी/मजुर/रोजदार.
माय रोजाने जाते किंवा घरकाम.
घरात २-३ भाऊ, १-२ लग्नाच्या बहीणी.
जमीन ३-४ एकर जास्तीत जास्त १०-१५ एकर (चुलते, भाऊसगळे पकडुन).
सर्वसाधारण प्रत्येक घरात ५-६ माणूस. असाच मराठ्यांचा परिवार.

कमावता एकच..
शिकणारे २ मुले:- त्यांच्या शिक्षणाचा खर्च, राहण्याचा-खाण्याचा, कपडे लत्ते, मधातच त्याचा एकदम आलेला दवाखाना, वेगवेगळ्या परिक्षेची लागणारी फीस.
(सर्वसाधारण एका मुलाला प्रत्येकी महीना २५००-३००० रु. कितीही लहाण शहरात राहिला तरी.)
वार्षिक त्याच्या जगण्याचा/राहण्याचा खर्च - ३६०००/-(दवाखाना आणि इतर खर्च सोडुन.)

आणि महत्वाच त्यात तो मुलगा *९६ कुळी मराठा पाटील-देशमुख*.

बिचारा बाप तिकड मर मर मरते, राबते शेतात.. इकडे पोरग १० ते १२ वी पर्यंत गांड फाटोस्तोर अभ्यास करते, घासुन घासुन चांगले मार्क घेऊन पास होते.
१०-१२ वी पर्यंत *जात* कुठच येत नाही त्याच्या आणि त्याच्या बापाच्या आड.

*जात* नावाच राक्षस १२ वी नंतर, त्या दोघासमोर अडमिशन पासुन असे हात धुवून मागे लागते कि बस्स.. जो पर्यंत तो मरत नाही, तोपर्यंत त्यांना सोडत नाही.

त्या लेकराच्या मायबापाच स्वप्न असते कि लेकरु *डाक्टर किंवा इंजिनियर* व्हाव.. त्याला त्याच्या *ओपन* औकातीनुसार *लायकीच* महाविद्यालय भेटते.!!
एडमिशन घेते.. नविन मित्र भेटतात.. लांब लांबुन आलेले.
ओळख पाळख होते सगळ्यांची.. आडनाव वरुन *जात* काढतात.. ग्रुप पडतात.

हे मराठ्याच *पाटील-देशमुख* पोरग, ४-५ एकरचा मालक, २-३ बहीणीचा भाऊ ज्यांच लग्न येत्या ३-४ वर्षात करायचं असते.
त्यांच्या सोय-या-धाय-यांनी इकडे *हुंडा, इज्जत, प्रतिष्ठा, मोठेपणा* या भुतांना पैदा केलेले असते.

या सगळ्या..
1) मुलाच्या शिक्षणाचा खर्च.
2) मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च.
3)  शेतातल्या सालगडी, रोजदार, औषधी, रोगराई, नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कर्ज.
4) बापाच्या-लेकराबाळांचा दवाखाण्याचा खर्च.
5) *हिंदू* म्हणून त्यात सनांवारांचा खर्च.
6) आणि अचानक भयानक येणारे Item तर कित्येक आहेत, त्यांचा खर्च.
7) काम धाम सोडुन, सोयरीकी, लग्न, मयती, सुख-दुःख, सोयरपन यांना जपण्यातच *मराठ्यांच* आयुष्य संपते.

हे झाले *मराठा* पोराच्या बापाचे.

*महाविद्यालयात शिकणा-या मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न/अडचणी*
१) पाटील-देशमुख असुन बिचारा तीन-तीन दिवस एकाच कपड्यावर काढतो.
३-४ दिवस कसतरी दिवस कटल एवढच खाऊन जगतो.
थाट, शान शौक तर खुप लांब.

२) त्याच्या सोबतचे SC, ST, NT, VJNT या Cast Category तील मुलांच्या राहणीमान म्हणजे.. मोटरसायकल, Smartphones, Shoes सोबतच Scholarships रुपी खैरात.. प्रत्येक महिन्यात नविन कपडे.
कोणी Category वरुन काही बोलणार नाही.
सगळ्यांना त्यांच्या *जातीची* भितीच.

३) मिळणा-या सवलति मध्ये सुट त्यांना, लायब्रेरी मध्ये पुस्तक घ्यायला गेले तर *Book Bank* रुपी सुट लागतील तेवढे फुकट पुस्तके,
आणि *open* वाल्यांना २-३ पुस्तक ते पण फाटके तुटके त्यांना देऊन उरलेले ५०% किंमतीने फक्त २.

महाविद्यालयीन फिस किती तरी पटी मध्ये कमी.
स्कॉलरशिप रुपी खैरात.
विविध योजना.
सुरक्षा.
ही झाल *आरक्षण* वाल्यांच.

४) प्रत्येक महाविद्यालयात गेले तर एक लक्षात येते आणि हमखास चित्र असते.. प्रिंसीपल, HOD, lectures, Staff हे उच्च जातीय *ब्राह्मण*.
ते बरोबर.. त्यांच्याच जातीच्या विद्यार्थ्यांना, मुलांना जवळ करतात.. ते सुद्धा आडनाव पाहुन.
ही ब्राह्मण जात म्हणजे Standard.
कधी कोणाच्या आधात नाही, मधात नाही, शांत.
मास्तरांचा, सोय-या धाय-यांचा, त्यांनी निर्माण केलेल्या देव देवतांचा आशीर्वाद सतत बरसत असतो.
सगळे जण, बरोबर Set होतात.

५) मराठ्यांना कोणीच नसते, बिचारे आशीर्वाद देणारे मास्तर नसतात.
संरक्षण देणार आरक्षण नसते,
साथ देणारे दोस्त.. बिचारे ते दोस्त.

सतत, ऐकु येणारे.. *पाटील-देशमुख तुम्हाला काय कमी आहे..??*

या वाक्याने, हाकेन १०-१२ वी पर्यंत कधीच *जात* न ऐकलेल्या पोराच्या मानेवर बसलेल राक्षस अस मन कोरून त्यात नैराश्य भरते.

ते दूर करण्यासाठी.. हातात येते, तंबाखु, गुटखा, दारु, सिगरेट.
रात्र रात्र रडत बसते, रोज मरते.

शिक्षण घेऊन कसतरी बाहेर पडते...
१) चांगली इंग्लिश जमत नसल्यामुळे.
२) आरक्षण नसल्यामुळे.
३) तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे. हाडकुळे/सडपातळ.
४) कंपन्या मध्ये ओळखीचे/नात्यातले कोणीच मराठे नसल्यामुळे.
५) शिक्षणा नुसार कुठेच लग्गे लागत नसल्यामुळे.
६) दुस-या जातीचे, शिक्षक ओळख देत नसल्यामुळे.
७) भेटल त्यांच्या कडुन *पाटील-देशमुख* तुम्हाला काय कमी आहे..?? अस हिनवुन.. झालेल्या अन्यायामुळे.

अशी कित्येक कारणे आहेत... त्यांच्यामुळेच.
हे स्वतःला *सुशिक्षित, उच्चजातीय, मर्द, ९६ कुळी मराठे, पाटील-देशमुख*
आज
*बेरोजगार* आहेत. *रस्त्यावर* आहेत.

*WhatsApp-Facebook* च्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

१) आमच्या मराठ्यांना छोटे मोठे काम करायला लाजा वाटतात.
२) कोनता व्यवसाय सुरु केला तर भावकी, सोयरे-धायरे, नाते-गोते, मित्र परिवार यांना उधारी देऊन समाज सेवा करावी लागते.
व्यवसायात सुद्धा टिकु देत नाही *जात*.
३) कलाकार म्हणून एखादे काम करायला गेले, कला असुन देखील कोणी स्पर्धेतच येऊ देत नाही. *जात* आडवी येतेच.
(चित्रपट, नाटक, टि.व्ही. शो सगळे एकाच जातीचे तिकडे.)

आणि समजा एखादे चुकुन गेले आणि करु लागले तर स्वजातीचे आणि सोयरे-धायरे बोलणार *शोभते का तुला..?? आपल्यात जमते का..??*

४) शिकुन शेती करायची म्हनल तर.. वयाची २५-३० वर्ष शिक्षणात घालुन.. इकडच काहीच जमत नसल्यामुळे *रिकामटेकडा,कठाळ्या*.

५) शेतात कामाला रोजदार भेटत नाहीत, पैसे नाहीत, काम नाही, व्यवसाय जमत नाही टिकु देत नाहीत, लेकीचे -बहीणीचे लग्न, इज्जत, इभ्रत.
कराव काय मराठ्यांनी..???

राजकारण... राजकारण हे तर दुसर्‍यांच्या सेवेसाठीच असते, थोडजरी जातीसाठी करायच म्हनलं कि... आरोप होणार जातीयवादी नेता.!!

आणि लोकं म्हणतात,
*तुम्ही ९६ कुळी मराठा पाटील-देशमुख, तुम्हाला कुठं काय कमी आहे ओ..??"*

सांगा मला..
१) एका तरी मराठा माणसाची बेरोजगार लोकांना नोकरी देणारी कंपनी..???
२) फिल्म इंडस्ट्री मध्ये मराठ्यांच्या लेकरांना काम देणारा अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता..??
(रितेश देशमुख ने किती मराठा लेकरांना नेले इंडस्ट्री मध्ये.)
बिचारा तोच कसातरी तिथे टिकवण्यासाठी लढा देत आहे.
३) राजकारणी मराठा नेत्यांनी आम्हाला रोजगार दिला अस म्हणाव तर किती.?? कुठे..??
बैनर लाव.. मोर्चे काढ.. गाड्या फोड.. एसट्या जाळ.. आंदोलन कर.. जेल मध्ये जा.. असाच हा हंगामी रोजगार.
(कारण त्यांचीच नोकरी ही ५ वर्षाची काय करतील..??)
जातीवर बोलले आणि काम द्यायच म्हनले कि समजा *शिट* गेलीच.
टि.व्ही वाले पेपर वाले.. जातीयवादी ठरवुन जिरवणारे आहेतच.
म्हणून ते गप्प.!!

मग प्रश्न पडतो मराठ्यांच्या पोरांने..
कोणाच्या तोंडाकड बघाव..?? त्याच तोंड बघायला कुणीच नसत.!!

कंटाळुन त्याला ती दारु जवळ वाटते.
ती जर घडत नसेल तर गळ्याला दोर - फाशी, विषयच संपला.
������������������������

मराठा क्रांति मोर्चा निमित्ताने खरच मराठा एक झाला असेल तर..
१) जाती साठी पिढ्यानपिढ्या चालणारा, सगळ्यांच्या जगण्याची व्यवस्था करणारा स्त्रोत निर्माण करावा.
पुन्हा कोणाकडे हात पसरण्याची, विनंती करण्याची, भिक मागण्याची गरज पडु नाही.

२) कोणत्याच नेत्यावर, सरकार वर विसंबुन राहण्याची वेळ येऊ नाही.
(ब्राम्हण - चित्रपट, नाटक, मंदिर ट्रस्ट, टि.व्ही, चैनल, शिक्षण, संगीत प्रत्येक क्षेत्रात स्ट्राँग नेटवर्क बनवुन आहे,
पिढ्यानपिढ्या न चालणारे उद्योग त्यांनी त्यांच्या समाजासाठी *जातीसाठी* निर्माण केला आहे.)
म्हणून त्यांना कोणासमोर हात पसरण्याची गरज पडत नाही.
- या उलट आपल्या मराठा समाजात आपल्याच जातीचे राजकिय नेते आपल्याच नेत्यांच्या विरोधात.
हेच त्यांच्यावर टिका करणार, आरोप करणार आणि अडकवनार.

३) कधीतरी बघीतलं का एखाद्या ब्राह्मण नेत्याने, कलाकाराने, कोणत्याही क्षेत्रातल्या ब्राम्हण वर टिका केली किंवा अडचण आणली कधी त्रास दिला..??
गुन्हा दाखल केलेला..?? आहे का उदाहरण.

४) एट्रोसिटी मरांठयांवरच का.?? कधी विचार केला का..??
एकातरी ब्राह्मणावर असे गुण्हे दाखल झालेत का..??

५) मराठ्यांनी आप आपसातले भांडण, तंटे, वादविवाद सोडुन..
उद्या येणा-या पिढीसाठी खरच एकत्र याव लागणार.

६) न संपणारी साथ, दिली पाहिजे.. धु-याचे,  शेजा-यासोबतचे भांडण विसरुन नव्याने सुरुवात करावी लागणार.

७) हुंड्यावर, राजकारणावर, निवडणुकावर, प्रतिष्ठेवर होणारा खर्च समाजाच्या कल्यानासाठी, प्रगतिसाठी करायला पाहिजे.

तरच मराठ्यांची प्रगति शक्य आहे.

या क्रांती तुन हे जर साध्य झाले तर म्हणता येईल..
*मराठा क्रांति - मराठा परिवर्तन*
*एक मराठा-लाख मराठा*

जय जिजाऊ.
जय शिवराय.!!
��������������������

- एक सुशिक्षित बेरोजगार मराठा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार