हरवलेली पाने.
पुन्हा एकदा अहमदपुरच्या आठवणीत...
✒ दिवाळी झाल की गावाकडुन अहमदपुर ला जातानाची same feeling. Experienced. ✒ परीक्षेचा अभ्यास करताना, गाव अन् घरचेच दिसायचे. Same होत आहे आजसुद्धा.
✒ फरालाच घेवून नेलेल ते टिकवून आणि वाटुन खातानाची मजा. आजही विसरता येत नाही.
✒ नव नविन कपडे दाखवुन, आपली दिवाळी किती मस्त झाली हे सांगतानाचा अनुभव.
✒ वडवणीच्या मुलांनी आनलेला ढोले अन् माऊली चिवडा.
✒ सकाळच्या नाष्टा, जेवताना तुप आणि चटणी असलेला मुलगा प्रत्येकाचा दोस्त व्हायचा.
✒ ती दर गुरुवारची साई बाबा आरती अन् मग साखर मिक्स नारळ खाताना यायची ती मजा! ✒ स्वयंपाकासाठी आनलेल जाळतन (धिपल्या) वर नेताना, अन् ते काम चोरपना आजही एकदम ताजा वाटतो.
✒ एकजन बाहेरुन येवून " चल लगवी " ला म्हनल्यावर.. बाहेर एका रांगेत सगळेच. ✒ अभ्यास करताना त्या डुलक्या.
✒ आपल्या पेटीसमोर ते सतरंजी टाकुन झोपन. अजुन भरपुर आठवणी आहेत.. ज्या आजुन आपल्याला शिकवतात...
"सर, पुस्तक काढलं कि गाव अन् घरच दिसायल हो!!" हा अजरामर dialogue ज्या कोणी वापरला त्यासाठी ही post...
#engineering exam चा अभ्यास करताना अहमदपुरची आठवण #
[8:09pm, 05/12/2015]
आयुष्यभर कधीच न संपणारी शिदोरी.!! - आजचा दिवस. ______________________________
गावात काय आहे..??
खेड्यात काय आहे..??
तिथली लोकं काय सुधरणार... अडाणी, अशिक्षित रिकामटेकडी.!!
असं आपल्या डोक्यात शहरात राहुन वाटत.. आपली जीवनशैली अन् त्यांची..??
पण, हे सगळ खोट ठरतं औरंगाबाद जवळील पाटोदा गावात गेल्यानंतर.. एक चांगल काम.. एक विचार किती बदल घडवतो हे दाखवुन दिल.. भास्कर दादा पेरे यांनी.
एकदम साधा.. आपल्या भाषेत येडा गबाळा माणूस.. शिक्षण फक्त 7 वी पास.!!
तरीही,.. तब्बल 20 देशांची भ्रमंती करून त्या देशाचा अभ्यास करणारा माणूस.!!
गावाचा सन्मान वाढवनारा माणूस.. राष्ट्रपति डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रतिभा ताई पाटिल यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून देणारा माणूस.!!
शहरात राहणा-या माणसाला "खेड्याकडे घेवून येणारा." संत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन... आज तोच एक कित्येक जणांचा प्रेरनास्थान झाला आहे .
#विशेषता :
✒️ मोफत पिठाची गिरणी गावचा महसूल वसूल करुन देते.
✒️ गावात सतत विविध गावातुन, शहरातुन, वेगवेगळ्या राज्यातुन आलेले.. पर्यटक, अभ्यासु, पत्रकार, विद्यार्थी यांची रेलचैल सुरु असते.
✒️ प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय शहरातील कार्यालयास लाजवेल.
✒️ "पुर्ण वेळ सरपंच".. फक्त पत्रिकेवर असणा-यांपैकी नाही .
✒️ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी गाव स्वच्छ ठेवण्याच काम करतात. ✒️ गावक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे वाढदिवस साजरे केले जातात. ✒️ स्वच्छ आणि निर्मळ पाणी पुरवठ्यासाठी.. आधुनिक पाणी पुरवठा योजना.. Swiping Card (ATM type ).
✒️ स्मशानभूमी ते पण प्रशस्त.
✒️ संपूर्ण गाव Solar System युक्त.
✒️ गाव आणि जिल्हा परिषद शाळा CCTV च्या नजरेत.
✒️ कार्यालयीन कर्मचारी व सदस्य यांच्या तर्फ अतिशय सन्मानाने वागणूक दिली जाते.
✒️ गावचा संपूर्ण Record. Computerized करण्यात आलेला आहे.
✒️ लोकसंख्येपेक्षा तिप्पट झाडे.
✒️ कित्येक मान्यवरांनी गावला भेटी दिलेल्या आहेत.. सिनेमा जगत, राजकिय, प्रशासकीय अधिकारी. खुप काही आहे गावात... "खरा भारत, तिथेच आहे ."
#धन्यवाद : YouTube, Google, दिव्या मराठी आणि Team.
Salute To Real Hero. - Bhaskar Dada Pere Patil.
---------------------------------------------
लेख त्यांच्यासाठीच ज्यांना.. आपल्या मातीच स्वप्न आहे.!!
---------------------------------------------------------------
ध्येया व्यतिरिक्त जीवन..
सकारात्मक.. नकारात्मक.. कि आव्हानात्मक..??
स्वप्न पाहणा-या माणसाला जर एखाद्या वेळेस स्वप्न नसेल तर, त्याचे जीवन खुप मजेदार होत असते.
तात्कालिक चांगल्या पणावर तो जे चांगले वाटेल ते करायचा विचार करत असतो.
विचार आणि आवड यांची जर सांगड बसत नसेल तर काय करायचं हा प्रश्न पडतो..??
आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन चांगले आणि वाईट क्षण येत असतात.
त्यावेळेस आपल्याकड बघुन जगणारे असतात यांची जाणीव ठेवावी. आपल्या निर्णयाकडे बघुन जगणारे असतात त्यांचा आधार व्हायचं आपल्याला याची नेहमीच जाणीव आसु द्यावी.
कधीच वाहत जाऊ नये.. सदैव प्रवासी आणि प्रवाही असावच पण एकाच दिशेने.
सर्व शक्ति एकजुट करावी आणि प्रवास करावा.
अप्रतिम लेखन सर
ReplyDelete