शेवटचे पाने..

Dedicated To Class :-

            एवढ एक सहन करा.

थोड शेवटच सेंटी मारत आहे...
-------------------------------------------------------
जाता जाता मला बोलायचं आहे...

आठवणींना रवंथ करुन,
प्रत्येक क्षण शब्दांच्या लाळेत गिळायचाय मला.!!

आठवतोय मला.. पहिला दिवस,
ज्या स्वप्नांमध्ये रंगुन मी येथे आलो होतो.
दगडाच काॅलेज पाहुन मनात हसलो आणि भारावलो होतो.

दुनियादारी ची स्वारी करण्यास निघालो होतो
अण् त्या पिक्चर मधल्या सारखे दोस्तों कि यारी में हसीन मेरी जिंदगी म्हणत..
कधी दिग्या तर कधी श्रेयस स्वतःमध्ये पहात होतो.

वाटत होत आमचा पण कट्टा असला पाहिजे, गरम चहाची कटिंग असली पाहिजे आणि सोबतच सेटिंग लावणारे, साथ देणारे दोस्त असले पाहिजे.

अस म्हणत, ते जगत सुरु झाली होती आमची ही "अभियांत्रीकीची दुनियादारी. " ना येथे स्क्रिप्ट होती ना सीन होता.. कोणी डायरेक्टर ही नव्हता तरी आम्ही हा चित्रपट करत गेलो.

आमच्या या चित्रपटात देखील आम्ही गायलो, नाचलो, खेळलो आणि भांडलो सुद्धा.

कोणी ॠषी पकुर तर कोणी दिग्या तर कोणी श्रेयस म्हणून जगलोत.

कट्टे भरु लागले, गप्पा रंगु लागल्या, मनाच्या भिंती पाडुन सगळे भेटत गेले.
बोलता बोलता सर्वजन खुलत गेले..
खुलताना तो कट्टा असा बहरत गेला कि त्याला सोडुन आता जावसच वाटत नव्हते.

वाढदिवस करण्याच्या त्या पद्धति.. ते प्रश्न.. तो मार.. त्या शिव्या.. ती टिंगल..
Night Out घासुन केलेल ते पुर्ण केलेल सबमिशन.. त्या GT मारुन काढलेल्या शिट..
यातुन कधी आम्ही आमचे झालो कळलच नाही. हा वेगळाच पिक्चर सुरु होता आमचा.
लेक्चर मधले ते विमान.. त्या शिंदे मैम.. ते ब्लाबी वालीबॉल.. अण् एखाद्याला टार्गेट करुन केलेला कागदी बोळ्यांचा तो मार.. आता नाहीच मिळणार.
अण् त्याच्यावर केलेल्या कविता.. किती ह्या आठवणी. नाही जाणार त्या...

ते आम्ही केलेला शिक्षक दिन.. त्यात दिलेले भाषणे.. ती रांगोळी.
अण् खलित्यात शिक्षकांना दिलेले निमंत्रण.. शिक्षकांना डेडीकेट केलेले साँग्स आणि त्यांची घेतलेली परिक्षा.. त्या दिलेल्या चॉकलेट.. आजही चघळायला मस्त वाटतात..

म्हैसमाळ ची ती गाड्यावर गेलेली सहल.. तिथली मस्ती.. धुम स्टाईल उतारावरून पळत सुटलेले.. अण् नंतर वर येऊन दम लागलेला तो श्वास... पोजा अण् त्या फोटो.. मग ते धाब्यावरच जेवन अण् सगळ्यांनीच खिशे भरुन घेतलेली बडीशोप आजही चघळायला मस्त वाटते..

थोड समोर गेल कि दिसते.. खुलताबादला पायी निघालेली रात्री ची ती सहल.. जय भद्रा म्हणत, खालेला तो प्रसाद त्या गप्पा.. पाय दुःखायले म्हणून वाळुवर घेतलेली ती झोप..
आम्ही जाणार खुलताबादला पुन्हा, पण गीत मात्र ते त्या रात्रीचच गाणार.

अण् ती गोवा ट्रिप.. ते डेडीकेटेड डीजे साँग्स.. ते दमशेर.. ती अंताक्षरी.. आणि त्या खारट पाण्यातल्या लहरी लाटा.
देऊन गेल्यात आठवणींच्या कित्येक गाठा.

किती ही तोडायचे अण् खोडायचे म्हणले तरी... ह्या आठवणी रहाणार.

आता नाहीच जमणार आम्हाला चिअरिंग करायला.. ते मेसा मेसा म्हणून.

महापुरुषांच्या केलेल्या जयंत्या.. साफ केलेली भिंत आणि रंगवलेले चित्र हसवणार आणि पुन्हा घेऊन जाणार आम्हाला त्या न्युज चैनल च्या "आगळ्या वेगळ्या शिवजयंती कडे ."
ते पाहून.. ऐकुन.. मनात गुदगुल्या होणार आणि ढोल व लेझीम च्या तालावर नाचायला लावणार.. आम्ही केलेला मराठी भाषा दिन .
ती किल्ला बनवताना चिखलात घातलेली रात्र.. पथनाट्य, पोवाडे आणि कविता मध्ये मन पुन्हा रंगणार आणि आठवणींच्या शिदोरीत दंग होणार .!!

अगदी पिक्चर मधल्या सारखच आमच्या सोबतही झालय,..
आम्ही सगळेच एक से बढ़कर एक आहोत.
सगळेच जण खुप मोठे होणार यात तिळमात्र शंका नाही.
पण,
आम्ही कोणी कोणाला "गिन्नाव".

आम्ही सगळे सेटल झालोत..
ज्यांना जे पाहिजे ते प्रत्येकाणे केल आणि जे पाहिजे ते मिळवल. आणि मिळाल.

बाहेर गावभर कितीही ढिंढोरा असला तरी आम्ही घरात कोणीच कोणाला. "गिन्नाव".
मग काय.. तुम्ही आम्हाला गिन्नाव तर आम्ही बी तुम्हाला गिन्नाव.

कस एकदम पिक्चर मधल्या सारखच ना.. "आमची ही इंजिनियरींग ची दुनियादारी."

खासियत म्हणजे आमच्या पिक्चरची तर प्रत्येक जण विलन.. अण् प्रत्येकजण
हिरो आहे.

सगळेच जण खुप मोठे आणि भारी आहोत.!!
_________________________________________

अद्वैत :-
1) Wallpainting पासुन आपली चांगली ओळख झाली. तु.. ����
#Hostel Bomb blasting प्रकरणात तु चमकला होता, तेव्हा तु बोला होता " आपल तोंडच मार खाते ओ, गुंडा वाट्टो. पण मी नाही.. "

Wallpainting च्या आधीची रात्र रिक्शात बसुन माझ्याशी मनमोकळा बोलला तु मन तिथच जिंकला.

2) मराठी भाषा दिन साठी ढोल ची पायपीट, उपाशी पोटी राहुन "नंबर एकच" करायच म्हनलेले शब्द.. नंतर ढोल वाजवताना तु दिलेली घोषणा.. ते तुझे प्रौढप्रताप पुरंदर.. अण् वाजवण्याची अदब शैली.

3) भान मधली तुझी एक्टिंग थेट काळजात पोहचली.

4) गैदरिंग मध्ये माझ नशीबच तुझ्या सोबत स्टेज शेयर करायला मिळाली, छोटी सी Add Mad मध्ये Act करण्याची संधी भेटली.
आपला "चिंपी बामनेच" First Prize मारले. नाना(अभय पिंगळे) आणि तु. Thank you.!!

काळीज जिरुन प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारं आद्व्या कायमस्वरुपी मन जिंकले तु.!!

All the best & Thanks for helping, supporting.!!

And Today's surprising gratitude vala attitude. ������

Will miss you - Adwya. ��
-----------------------------------------------------------------

कुछ बातें समझ में आणे लगी है.. After Engineering.!!

दिल कि कभी मत सुना करों,
पागल बना देता है वो.

हर बार दिल के साथ दर्द और सुकुन कि ही बात करते है.

कभी भी किसी चिज में दिल मत लगाना,
दिमाग से ही लेना.

इस दिल में हि यादें रहती है, जब आती है थोड़ी हसाती है, लेकिन दर्द दे के ही जाती है.
क्योंकी वो पल फिर से नहीं मिल सकता ये बता के जाती है वो यादें.

दिल है तो दर्द ही होता है कहीं पे भी लगावो.
दिल से किये हुये काम से सिर्फ उसी क्षण में ही खुशी मिलती है.

अंतिमतः सोचने के बाद समज में आता है, दिल वाली बातें, चिजे, लम्हें अक्सर दर्द और सिर्फ दर्द ही देती है.!!

#कभी छोड के जाने का दर्द.
#कभी ना मिलने का दर्द.
#कभीं यादों का दर्द.
#कभी किसी बातों का दर्द

सभी प्रकार के दर्द हमेशा दिल में छिपे रहते हैं.
कभी भी बाहर आकर रुला के जाते है.!!

��. दिल कि कभी मत सुनो, दिमाग की ही सुना करों .��

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

सलाम.. पत्रकार