लेखणीने ज्यांना जिवंत ठेवले त्यांच्यासाठी.. #125th Birth Anniversary.
तलवार गेली.. गद्दा गेली.. धनुष्य बाण गेले.. गोळे गेले.. दांडपट्टे गेले.. संपले. त्यांच अाजचे अस्तित्व म्हणजे एखाद्या संग्रहालयातच, वास्तु संग्रहालयातच ते सुद्धा काचे आड, झाकुण.!!
एक दिवस बंदुका आणि चाकु सुद्धा जातील.. संपतील..
जगातील सगळे हत्यारे आणि शस्त्रे गायब होतील.
पण, एकच शस्त्र अनादि काळापासुन जिवंत आहे... जिवंत रहाणार, ज्याला मरण नाही.. ज्याच्यामध्ये मेलेल्यांना सुद्धा जिवंत करण्याची शक्ति आहे ते हत्यार.. ते शस्त्र म्हणजे.. "लेखणी.".!!
ज्यांच्याकडे विचारांचा आणि शब्दांचा दारुगोळा आहे त्यालाच हे "लेखणी." चे शस्त्र वापरता येणार.
मग, ते त्यांच्यावर डिपेंड आहे ..
ही लेखणी जोडण्यासाठी वापरायची..?? कि, तोडण्यासाठी..??
# लेखणी च्या माध्यमातून अजरामर झालेल्या सर्व महापुरुषांना. अर्पण.
# "लेखणी-लिखाणाची" ताकद दाखवून देणारे भारतरत्न, विश्वरत्न, लेखणीसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व लिखाणास स्मरुन.
आज माझी लेखणी सुद्धा बोलायच म्हणत आहे..
म्हणून,
✒️लेखणी हातात घेतल्यावर..
थेट मनाचं, मनातुन, मनासोबत बोलणे.
125th. BIRTH Anniversary .
Comments
Post a Comment