२७ फेब्रुवारी २०१६. #मराठी भाषा दिन.
खुप लिहायचं आहे... खुप बोलायचं आहे...
किती जणांचे नाव घ्याव..
किती तरी चेहरे दिसत आहेत.
काय गरज होती..???
रात्रंदिवस ढोल आणण्यासाठी पायपीट करायची..??
भाजी भाकर विसरुन पोटाला मारुन मर मर करायची..??
घरच्यांच्या शिव्या खाऊन.. उरावर ढोल घेऊन वाजवायची गरज काय होती..??
हाताची बोटे फुटेपर्यंत ढोल का वाजवले... उपाशी पोटी, ना उन्हाची पर्वा.. ना घामाची पर्वा.. का..?? कशासाठी..?? कोणासाठी..??
मिळालं तरी काय..
किल्ला बनवायचा होता... हो.!! बनवला..
त्या साठी.. सलग दोन वर्षापासून रात्रंदिवस मेहनत करुन बनवलेली BAJA ची गाडी वापरली कशाला..?? माती आणण्यासाठी.. एवढे मुलं हाताला व्रण येईपर्यंत सिमेंट चे ब्लाक्स का उचलले..???
दुस-या दिवशी नोकरीसाठी मुलाखत होती.. दारात कंपनी होती...
स्वामी आणि सागर का.?? तुम्ही रात्री 4:30 पर्यंत चिखलात खेळले.??
विशाल मारकवाड तु तरी का केल हे..?? झोप मोडुन..
का..?? एखादे सर्टीफिकेट मिळाले..?? पैसे मिळाले..??
नितीन गोसावी तुला तर बोलुन फायदाच नाही..
उपेंद्र लिमये यांच्यासाठी मुव्ही डायरेक्ट करायची तुझा नियोजित दिवस होता.
मग, तुला अण् तुझ्या टिमला ३-४ दिवसापासून उपाशी न झोपता.. दिवसभर त्या जिमखाना मैदानात.. सगळे लेक्चर, प्रैक्टिकल, सोडुन पथनाट्याची प्रैक्टिस का केली रे..??
सतिष बावणे, पुजा काय म्हणाव तुम्हाला अण् तुमच्या लेझीम च्या सरावाला ..??
त्या पंक्या राठोड ला काय गरज..?? शाळेतील लेझीम आणुण द्यायची ...
शिवाजीमहाराज, खंडोबा, बाजीराव, सावरकर, तुकाराम महाराज, जिजाऊ, मावळे, यशवंतराव चव्हाण होण्यासाठी ५००-१००० का .??
रोहित्या ३-४ दिवसापासून उपाशी.. त्याच्या मनात एकच प्रश्न..
ढोल च मैनेजमेंट.. टिम.. परवानगी.. काही गोंधळ झाला तर..?? ते आणुण द्या नेऊन द्या.. फुटले तर पुन्हा आपल्याच बोकांडीवर.. जरा जरी इकड तिकड झाल तर.. पावती रोहित्या वरच फाटणार.. शिव्या तेच खाणार.. नुकसान तेच भरणार..
हे सगळ माहिती असुन सुद्धा का जिम्मेदारी घेतली..?? हिम्मतच आली कुठुन इतकी..??
महेश्या, रोहित्या, निकिता, जयश्री, सुजाता, मान्या २-३ वर्षापासून स्पर्धा परिक्षेची तयारी करतात.. मागच्या १०-१५ दिवसापासून जीव झोकून.. मारुन.. मरमर करतात.. ५-६ पेपर वाचल्या शिवाय ज्यांना जेवन जात नाही ते सगळे एवढा टाईमपास का.. करतात..??
त्या कवडे चा काल वाढदिवस होता.. दरवर्षी आम्ही करत असतो.. ८-१० वर्षापासून न चुकता दणक्यात साजरा करतात.. यावर्षी साधी शुभेच्छा ही नाही.. Dp सुद्धा ठेवली नाही. कोणीच ..??
सगळ्यात आधी भालचंद्र मैडम ला धन्यवाद.
त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, हिम्मत दिली, कौतुक केल,
मैडम तुमच्या शिवाय कालचा अण् १९ चा दिवस शक्यच नव्हता.
आहिरराव सर अण् मोपारी सर तुम्हाला आमच्यामुळे खुप त्रास झाला.. सुट्टीच्या दिवशी पण पुर्णवेळ एक्स्ट्रा काम कराव लागले.
अडवाणी सरांनी जी कौतुकाची थाप दिली त्याने आमचं मनोबल, ताकद खुप वाढली आहे.
देगावकर पाटिल, तिडके साहेब, अक्षय पवार साहेब तुम्ही अण् तुमची गैंग सलाम.. मुजरा... दंडवत .
FE SE TE BE सगळे जिका एका शब्दात लिहायचं पण भेटत नाही.
अद्वैत, नितीश, शंतणु, विशाख, अभिजीत मोरे, किती किती जण आहेत हे.. का.???
आमची बैच म्हणजे BE ची सगळ्यात हुशार.. जास्त पाईंटर बैच.. कोणी आगाव नाही.. कुठला धिंगाणा नाही.. मोठेपणा नाही.. लफडा नाही.. मैटर नाही.. भांडण नाही .!!
जरी धिंगाणा केला.. आगावपणा केला तर आपल्यातच १०-१५ जणांत.. ते पण वाढदिवसालाच.. त्यात सुद्धा कोणाला त्रास होऊ नाही याचीच काळजी.विचार.!!
डिपार्टमेंट च्या भिंती तर आम्ही पाडुन टाकलेल्या.. आम्हाला गर्व, अभिमान, स्वाभिमान फक्त "जिका" या शब्दाचाच .!!!
अादिनाथ, अभिजीत, मारकवाड, गायके, तारकेश्वर, वैभव जोगदंड, मंग्या, विनीत भाई, लका तवा तुषार, विक्या, पंक्या, शुभ्या, अभंग, आमल्या, शैल्या, सुजित, सोमानी ब्रदर्स, नितीन भावा.
गेडाम, सच्या, घोडके, क्रष्ना, मनोज, तोकलवाड, भामरे, ओमप्रकाश, सुरेश भांगे, किती हे नाव आहेत.. बैच अमर यांच्यामुळेच रहाणार
MCA, Compsa, IT किती महान लोकं आहेत सगळीकडेच..
हो .!!
अजुन लय लिहायचं आहे...
पोरीबद्दल तर काही लिहील नाही आणि बोलों पण नाही अजुन.
एक पायंडा घातला आमच्या बैच ने जिका मध्ये..
किती वर्णन कराव ..??
मुद्दाम हुन उशीरा अण् कमी शब्दात लिहायचं आहे मला विशाल कोकाटे, गणेश माळी, चैतन्य, अमोल
काय केल तुम्ही माहीत आहे का.. काल..???
विचारा सगळ्यांना.. मी बोलणारच नाही काही.!!! तुमच्याबद्दल .. कारण , तुम्ही मेंदुपासुन ते मनापर्यंत तुमचच राज्य आहे..
नशीब लागत खरचं. एवढ्या महान लोकांसोबत काम करण्याच.. रहाण्याच.
आता, जाई जुई बद्दल...
सिंदखेडराजा ला पहिली वेळेस त्यांचा पोवाडा ऐकला... समोर होती ७-८ लाख पब्लिक... स्टेज वर होते.. संभाजी महाराज... कित्येक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी अण् लय महान लोकं.. त्यांच्यासमोर ह्या जाई जुई पोवाडा म्हणत होत्या जीव तोडुन.. आपल्या कॉलेजच्या आहेत हे समजल विश्वास नव्हता बसत... एवढ्या मोठ्या कलाकार आपल्या महाविद्यालयात आहेत... स्टेज वरुन खाली आल्या की ... त्यांच्यासोबत फोटो साठी गर्दीच गर्दी... बोलुन गेलो.. तुमचा पोवाडा आपल्या महाविद्यालयात झाला पाहिजे.. तेव्हा बोलताना सहज बोललो..
अण् काल ते शब्द सत्य झाले.
१९ फेब्रुवारी ला ज्यांचा मुख्यमंत्र्या सोबत देखील पोवाडा होणार होता.. फक्त CT मुळे त्या जाऊ शकल्या नाही..
महाविद्यालयातील कित्येक जणांना माहिती पण नव्हत कि महाराष्ट्राला ज्यांच्या शाहिरी ने जागे केल ते आपल्यातच आहेत. थक्क झाले काल सर्वजण.. ऐकताना अंगावर काटे .. अण् आवाजासोबत शहारे येत होते काल..
पंक्या तु गाडी दिल्यामुळ सिंदखेडराजा ला गेलो.. अण् गाढे पाटील तुमच्या मुळे बघायला मिळाला .!!
सगळे कैमरामैन.
चकोर मामा अण् सगळे मामा लोकं.. धन्यवाद.!!
अभिजीत रसाळ साहेब तुम्ही लई टेंशन घेवू नका गडे. आता जरा आराम करा .
*****
आणि हो.. या शेवटच्या लाइन्स तुझ्यासाठीच.. एका वर्षात जेवढे स्वप्न पाहिले.. ठरवले ते पूर्ण केलेत.. प्रयत्न केले.. सगळेच पूर्ण होतील असं कधीच होत नसत याची जाणीव आहे.
ज्या काही गोष्टी केल्या त्याची जेव्हा मी उजळणी करतो त्यात तु शूण्याच्या ठिकाणी आहेस.. जस शूण्यापासुन सर्व अंकांची सुरुवात होते तसच तीच जागा.. भूमिका तु बजावली आहेस.!!
समाधान खूप आहे.. परवानगी मिळालेले दोन्ही इव्हेन्टस चे लेटर दाखवून सुरुवात केली होती.
१९ फेब्रुवारी चा रिझल्ट आणि २७ फेब्रुवारी रिझल्ट दोन्ही बघीतले समोर आहेत.
जो पर्यंत काॅलेज असणार तो पर्यंत ते टिकूण रहाणार असे काम केलय. हो..!!
उणीव आणि कमी फक्त एकाच गोष्टीची रहाणार शेवट पर्यंत.. मित्र सुद्धा होऊ शकलो नाही.
तरीही, धन्यवाद तुझ्या All The Best ने खुप मोठ काम केलय.. ताकद दिली.. एक स्वप्न दिल.!!
शूण्याची किंमत माहिती आहे.. खूप ताकद असते.. झिरो करायच कि हिरो करायच..??
50% क्रेडिट माझ्याकडून तुलाच...
.काम करतानाच चुका होतात, चुकुन चुका झाल्या आसतील तर माफ करा.
---------------------------------------------------------------
देव आहे का नाही माहिती नाही पण,...
देवासारखे दोस्त असतात..!!
देव सुद्धा मंदिरात आपल्या पेक्षा दुर असतो.. त्याचा आशीर्वाद असतो.. शुभेच्छा असतात.. सदिच्छा असते.!!
काल आणि १९ ला या देवांची भुमिका करणा-या आमच्यापासुन दुर राहुन आशीर्वाद राहणा-या सगळ्या दोस्त देव, मित्र देव यांना वंदन.. दंडवत.
नांदेडहुन पुण्याला स्थलांतरीत होवुन आशीर्वाद देणारे देवलोक :
गाढे पाटील, राम पाटिल, दिपु नावले, गावंडे साहेब, निखील चव्हाण, गणु अडकिणे, मंगु दा, गौरव देशमुख, डॉ. देसाई, विक्रम देशमुख,
आणि आमची सगळी नांदेडची Intelligent Idiot गैंग.
अहमदपूर च्या सगळ्या दोस्त अण् सर देवांना. दंडवत .
नांदेड मधील नेहमीच सोबत असणारे देव :
पमा भाऊ, रवि आप्पा, सुद-या, समी-या, अण् नांदेड Intelligent Idiot शाखा, भाग्यनगर .
मुंबई चे दोस्त देव :
प्रजेश रोडगे पाटील, बालाजी हळदे, निखील नाईक, पप्पू उगले.
IIT, Mumbai चे नवसाला पावणारे जयेश वारजुरकर, प्रेक्षा शर्मा.
औरंगाबाद हुन पुण्याला स्थलांतरीत देव माणसं :
अतुल पहिलवान, गणी भाई, स्वप्नील पुरी, पुष्कर देशमुख, मयुर लांजेवार, प्रतिक नलावडे, अण् सगळी GECA Senior Gang .
योगेश डाबरिया, चंद्रशेखर बोंगाणे, रामदास नरवाडे, धनंजय नरमल्ला. सगळे देव.
स्थानिक देव माणसं :
शुभ्या, अभंग, मेखाले साहेब, पंकज भाऊ हिवराळे.
सगळ्या देवांना.. साष्टांग दंडवत.!!
Comments
Post a Comment