मनात घर करुन .2015. जात आहे...
गोष्ट एका 'ONLINE' गावाची ..!!
----------------------------------------
एक होत गांव ... TE Mech त्याच नाव.
गुण्या गोविंदाणे तेथील लोकं रहात असत. अगदी प्रशस्त, प्रसिद्ध, सम्रद्ध, नेहमी प्रसन्न व सतत हसरं.. अडी अडचणीत, कठीण प्रसंगी, सुख दुःखात सगळ्यांची काळजी करणारं अस ते, गाव.
आठरापगड जाती व १२ बलुतेदार यांच्या साथीने गावगाडा नांदत तेथील गावकरी. नेहमी उत्साहित व क्रियाशील, कार्यतत्पर असल्यामुळे पंचक्रोशीत एक वेगळीच ओळख होती.. दबदबा होता.. गावाचा अण् नावाचा.!!
तिथे,
ना कोणाला मोठेपणाचा आव होता.. ना बडेजाव, होता फक्त बंधुभाव..!!
कलाकार, खेळाडू, अधिकारी, कष्टकरी, अभ्यासु, विद्वान, किर्तीवान, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात गाजलेल्या महान लोकांमुळे तर गावची ख्याती होती. लहाण थोरांच अस ते महान गाव. सणा-वाराला, वेगवेगळ्या निमित्ताने त्यांचे मेळावे व्हायचे, भेटी गाठी व्हायच्या..
विविध माध्यमातून ते तो आनंद साजरा करत, नेहमी नाविण्याची कास धरुन.. सतत प्रगतिशील असायच.
त्या ONLINE गावात, सर्व नागरिकांचे त्यांच्या कामगिरी नुसार सत्कार होत असत, प्रशंसा केली जात असे, शुभेच्छांचा वर्षाव व्हायचा.
आठवणी ने सर्वांचे जन्मदिवस मोठ्या उत्साहात होत असत, त्या निमीत्ताने चुलबंद भंडारा असायचा. या निमीत्ताने सगळे एकत्र येणार.. हसणार.. खेळणार.. मोकळे बोलणारं.. विविध विषयांवर चर्चा करणार.
या सगळ्या वातावरणामुळे गावची दिवसेंदिवस प्रगति होत असे. सलोखा असायचा.
एक मात्र होतं तेथील स्री-पुरुष सुरुवातीस मोकळी बोलत नसत.. लाजायचे.!!
हे काही ठीक नाही.. असं ब-याच जनांना वाटायचं. हे टाळण्यासाठी, समस्या दूर करण्यासाठी गावातील एका जाणकाराणे.. एक 'व्यासपीठ' (WA group) निर्माण केला, ज्या मध्ये सर्व गावकरी सहभागी होतील, विचारांची देवाण घेवाण होईल या हेतुणे.
मग त्या व्यासपीठावर.. सुविचार, कविता, विनोद, वेगवेगळे चित्र, प्रेरणा दायी कथा, राज्यातील, देशातील बातम्या, थोरा मोठ्यांच्या गोष्टी झळकु लागल्या.!!
सदैव प्रसन्न असा प्रवाह असायचा.. एकदम ताजा अण् हवा हवासा.. वातावरण हलक फुलकं ठेवण्यासाठी, ठेंगे, comments , हसरे तोंडं, बोलके चित्र वापरुण व्यासपीठावर नवनविन सादर करण-यास दाद दिली जायची जायची, प्रशंसा व्हायची .
यांमुळे गावच्या ONLINE बाजारात, नवनवीन, एकदम ताजा 'माल' असायचा. येण केण प्रकारेण, 'व्यासपीठ' बोलकं.. हसरं.. खेळत ठेवणे हाच सर्वांचा प्रयत्न असायचा.
चांगला प्रतिसाद मिळत आहे पाहुन 'व्यासपीठ' चा मुकादम कधी कधी चहापाण्याचा कार्यक्रम ठेवत असे.. शाल श्रीफळ, हार तुरे देवुन सत्कार करायचा ज्यातूण गावकरी पुन्हा एकत्र येत आणि भेटत. या मुळे सगळ्या गावक-यांना वाटायचं की, "बाजारात आपला सुद्धा माल असला पाहिजे." गावकरी हळु-हळु त्या व्यासपीठासोबतच बोलके झाले, प्रत्येकाची दिवसातून एकदा तरी चक्कर असायचीच, कोणी कोणी फेरफटका मारुन जायचे. भेट मात्र सर्व जण द्यायचेच.
नंतर नंतर तर गावातील विविध विषयांवर, महत्वाच्या प्रश्नांवर येथेच चर्चा व्हायची. माहिती पुरविल्या जायची. व्यासपीठावर शासकिय, राजकिय, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील विद्वानांची, जाणकारांची, २४*७ रेलचैल असायची, ताबडतोब शंकेच निरसण केल जायचं, अडी अडचणीत मार्गदर्शन केल जायचं.
कधी कधी तर या ठिकाणी वाद प्रतिवाद व्हायचे, टोकाची चर्चा व्हायची. 'गैंगवार', द्ववंद्वव युद्ध देखील झालीत त्या व्यासपीठावरच.
क्रिकेट, चित्रपट, मालिका, सामाजिक, राजकिय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील घटणेवर प्रतिक्रया देत व्यासपीठ चालत बोलत ठेवायचे. म्हणजे नेहमीच ते बोलकं असायच.!!
नवनवीन उपक्रम, प्रदर्शन सोहळे देखील होत. तसेच सर्वांच्या करमणूकीची काळजी घेतली जायची या ठिकाणी.
या पार्श्वभूमीतुन गावातील नागरिक जेव्हा केव्हा पत्येक्ष भेटायचे तेव्हा 'व्यासपीठ'वरील त्याच गोष्टी बद्दल बोलायचे, गप्पा मारायचे, हसायचे, मनमोकळे पणाने खुलायचे. त्यांच्यातील बंध खुलत गेले.. मन मिळत गेले..!! सगळ्यांना, "मस्त आहे, असं काहीतरी पाहिजे.!" वाटायला लागलं.
मात्र, त्यांच्यातील एक मुद्दा समान असायचा.. म्हणायचे, "आपण फक्त ONLINE सोबत आहोत.. एका छताखाली आहोत.. खरंतर प्रत्येक्षात कुठचं काही नाही.. मुल-मुली बोलत नाहीत.. एकत्र येत नाहीत.. एक मेकांबद्दल गैरसमज.. कायतर नुसती हवा.. ती सुद्धा त्या तिथ व्यासपीठावर.. अस काय कामाच..?? सगळा खोटेपणाच." अश्या नेमक्या प्रश्नांवर बोलणं व्हायचं, चर्चा व्हायची. मग वाटायच, "हो!, राव.. असचं होतय.. हे कोठेतरी थांबल पाहिजे.. मनातुन एकत्र यायलाच हवं.!! "
सगळ्यांची एकच भावना होती, धारना होती, प्रार्थना होती अण् मनोमन इच्छा होती, "आले पाहिजे एकत्र, बस्स आता एक झाले पाहिजेच.!!"
सर्वसाधारण, सामान्य गावां प्रमाणेच या ही गावात भावकी, भाऊबंधकी, गट-तट, होतेच कि.. जस कि, " Hostelide, Localide, DSE, Boy's, Girl's, जूणे-पुराने, हुशार, गरीब, श्रीमंत, शांत, नेते, कार्यकर्ते, वाड्यातले, वाड्यावरचे, वाड्याखालचे, गल्लीतले, कशाचच काही घेण देने नसणारे,.."
असे वेगवेगळे गट-तट या गावात सुद्धा होतेच.. अगदी गावा प्रमाणेच येथे ही हेवेदावे व्हायचे.. असायचे.!!
आणि गावातील वैचारिक माणसांप्रमाणेच.. एक विचार.. एक आचार.. एक भावना.. प्रत्येकाच्या मनात होती ती म्हणजे,... "एकी".!! '
एकी'तून - विकास.!
'एकी'तून - एकोपा.!
'एकी'तून - प्रगति.!
तुकाराम महाराजांच्या अोवीप्रमाणे,
"एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ.!"
'एकी' च महत्व सर्वजण जाणत होते, मानत होते. म्हणून त्याबद्दल बोलु लागले, वाटु लागलं, बदल झाला पाहिजे.! गावात विचारांची, नवनवीन कल्पनेची काही कमीच नव्हती. अतिशय प्रगल्भ अण् बागायतदार अस हे गाव. म्हणूनच "लई हुशार." लोकांच गाव अशी पंचक्रोशीत अण् राज्यात ओळख होती.
असचं एकदा मनात गुदमरलेल्या त्या 'एकत्र' येण्याच्या प्रश्नांवर थेट त्या व्यासपीठावरच.. सर्वांच्या समक्ष बोलायचं.. चर्चा करायची.आणि काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकायच अस गावकरी मंडळीनी, प्रत्येक्षात भेटुन, एकमेकांत - भावकीत - शेजा-यांत - मित्रमंडळीत, त्या प्रश्नांला वाचा फोडायची हे ठरवलं.
आणि सर्वांच्या साक्षीने, बहुमताने ठराव पारित झाला, "ज्वलंत अण् अति महत्वाच्या त्या प्रश्नांवर चर्चा झालीच पाहिजे."
सगळीकडे वातावरण तयार झाल.. लोकं कामाला लागले.. मनातुन उतरले.. दिवस उजाडला.. अचानकच कोणीतरी त्या तिथ व्यासपीठावर बोलुणं सुरुवात केली.
ते महाशय म्हणाले, "आपल्या गावातल्या पोरी, गावातल्या पोरांना पोरी पटवून देण्यास मदत करत नाहीत.. बोलत नाहीत.. काही सांगत नाहीत. नुसतं ONLINE ठेंगे दाखवून.. दात इचकुन.. खुश करतात.. अण् लई मोठेपणा, तो-यात राहतात,.!! गावक-यांनों.. मंडळीनो हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा..?? "
थोड्यावेळाने, असं बोलले कि लगेच मंडळी 'व्यासपीठ'वरील त्या 'आखाड्यात' उतरली. आणि वेगवेगळ्या पद्धतिने, मार्गाने, प्रतिक्रया द्यायला लागले.. बोलु लागले.. त्या प्रश्नाला फोडत होते.. तोडत होते.. या कार्यकर्त्याने तर 'डायरेक्ट' गावातील अति संवेदनशील भागावरच हमला केला, पहिल्याच खेळीत वातावरण गंभीर करुन दिल.
त्यातून झाल असं कि, गावातील समस्त महिला मंडळीचा "Ego Hurt" झाला. आणि त्यांच्या सवयीनुसार कुजबुजु लागल्या.. वाकडे तोंड.. दात इचकुन.. आडवे ठेंगे दाखवून निषेध व्यक्त करत होत्या.. हळु-हळु बोलायला लागल्या.. त्यांच्यातील दोघी-तिघींना 'अपमान' सहन न झाल्यामूळे प्रत्युतर देण्यासाठी.. सरसावुन, आवेशाने तुटुन पडल्या.!!
त्या एकाच मुद्यावरून त्या पेटल्या.. चिडल्या.. आखाड्यात येवून भांडायला लागल्या.. ते त्यांची बाजु मांडत होत्या.!! आणि पुरुष मंडळी सुद्धा वेगवेगळे शस्त्र वापरत प्रतिकार करत होते.. आता युद्ध दोन्ही बाजुच्या अस्मितेच झाल होत.!!
अस्मितेला ठेच लागत असल्या कारणाने हळु-हळु सगळ्याजणी येत होत्या.. हमले करत होत्या.. हे त्यांच्यावर, ते यांच्यावर तुटुन पडत होते. मध्येच कोणीतरी त्या व्यासपीठावर येवून.. व्यासपीठावरील व्यक्तिंस हिणवत होते.. चिडवत होते.. टोमणे मारु लागले. याच संधीचा फायदा घेऊन कोणी कोणी तर.. पुरानी दुश्मनी का बदला लेने की सोच में थे..!!
यातुन मग शाब्दिक चकमक होऊ लागली.. प्रश्न पेटत होते.. उत्तर भाजत होते.. सगळीकडे हल्लकल्लोळ माजला.. काही ठिकाणी तर जाळपोळ होत होता. वातावरण थंड करण्यासाठी हसरे बाण.. टोमणे.. खिल्ली.. वेगवेगळे न पाहिलेले शस्त्र येत होते..!!
मध्येच कोणीतरी पक्षांच्या 'थव्याचा' शोध लावला.. हे तर खूप तीक्ष्ण अण् नवीन च शस्त्र होतं. काहीजण तर जंगलातील हिंस्र पशु-पक्षी सोडत होते.
व्यासपीठ पाहुन वाटायचं, "काय जंगल आहे का हे..?? सगळा जंगलराज.!!"
या सगळ्या धिंगाण्यात महत्वाचा तो प्रश्न.. ज्या साठी समस्त गावकरी आले होते.. तो प्रश्न.. ती समस्या, भरकटत होती.. बाजुला पडत होती.. म्हणून, "Come to the point.!" म्हणत गाडी समस्येच्या निराकरणासाठी 'Track' वर आणत आणि चर्चा सुरु होत असे. या सगळ्या धिंगाण्यातून बरोबर परिणाम साधला जात होता, हळु-हळु मन जोडु लागले.. युद्ध शांत होऊ लागलं.. दोन्ही बाजुच्या मंडळी थंड घेत, एकत्र येऊ लागल्या... आणि एका आवाजात म्हणु लागले,
"जे झाले ते झाले.... " "इथून पुढे.. या नंतर अस नाही होणार.. काळजी घेवू..."
अशी अश्वासन देत विषय पुढे सरकवु लागले. भविष्यातील येणा-या अडचणी टाळण्यासाठी, निराकरण करण्यासाठी,.. समित्या.. गट.. विभाग.. स्थापन करण्यात आले. मनातील सगळे विषय सर्वांगाने विचार करुन मांडले जाऊ लागले.
पहिल्या टप्यात प्रत्येकाच्या सासरवाडी आणि माहेर यांच्या ओळखीचा कार्यक्रम झाला तर काही जणांची सासरवाडी जाहीर करण्यात आली. सोबतच गावातील काही जोड्यांची सोयरीक लावण्याचा प्रयत्न केला गेला.
या कार्यक्रमातुन काही गोष्टी निष्पन्न झाल्या.. त्या म्हणजे, गावातील कोणाकोणाचा जनसंपर्क आहे.?? पंचक्रोशीतल्या, गावातल्या गावात, गावा बाहेरील, राज्यातील, आजु-बाजुच्या गावातील, नागरिकांसोबत.. हितसंबंध आहेत..?? नाते आहेत..?? ओळखी आहेत..?? ई. गोष्टी समजल्या.
या ओळखीच्या कार्यक्रमात सगळ्यांचे card उघडे पडू लागले.. मनातले पान दिसु लागले.. हुरळुन जात होते सर्वजण. या सगळ्या खेळात काहीजण आपली सेटिंग लावत होते तर काही दूस-यांची सेटिंग लावण्याच्या प्रयत्नात होते. "इसमें सबका नंबर आनेवाला था.. मौका सबको मिलता था.. "
विषय टाळण्यासाठी.. आपला नंबर पुढे ढकलण्यालाठी खेळ खेळु लागले.. तर काही पळुन जात होते तर काही लपून गुप्त पणे वार करत होते. यात निकाल लागत गेला.. एक एक विषय संपत होता.. सगळ्या गोष्टी येऊ लागल्या समोर.. समजु लागल्या..!!
यातूनच.. ओळख पाळख कार्यक्रमातुन गावक-यां समोर एक गोष्ट समोर आली ती म्हणजे,
"राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्या सोबत गावाच नात आहे. प्रेमाच.. स्नेहाच.. आपुलकीच. " गावकरी आवाक झाले.. भारावुन गेले.. आनंदी झाले.
"राज्याचे मुख्यमंत्री गावचे जावई.. आणि गावक-यांचे.. गावाचे भावजी.!!"
किती मोठी ही गोष्ट.?? गावासाठी.. गावच्या प्रगतिसाठी.!!
अभिमानाची आणि सन्मानाची बातमी कार्यक्रमातुन जाहिर झाली होती.
जाहिर झाल कि लगेच सगळीकडे फटाके वाजले.. फुलांचा वर्षाव झाला. तर गावातल्या चौका चौकात बैनर लागले.. पोस्टर चिटकले..!!
त्या ONLINE गावच्या कमानीवर लिहिण्यात आलं,
"व-हाड निघाल.. भावजीच्या गावला."
पाट्या लागल्या त्या व्यासपीठावर.
नंतर सगळीकडे पारा-पारांवर, कट्ट्यावर, वट्ट्यावर, चैकाचौकात, गलोगल्लित एकच चर्चा.. "भावजी.. वहिणी.. याच सोयरपण.. त्याच सोयरपण.. कोणाची सोयरीक तर कोणाची सेटिंग..." हेच चालु होते जिथे तिथे..!! सुत्र बनत होते.. सिद्धांत मांडले जाऊ लागले.. (N,N+1)..!!
त्यातून आणखी काही गोष्टी समोर आल्या.. समजल कि, "मुख्यमंत्र्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री देखील गावचे जावई आहेत तर काही मंत्री दुरुन सोयरे.. नात्यातले आहेत." गावात एक जोश.. उत्साह आणि आनंद संचारत होता..
चेह-यावर हसू नाचत होत. खुशहाली ही खुशहाली..
या निकालामुळे म्हना किंवा प्रकरणामुळे गावातील काहीजण नाराज झाले तर काहीजणांच्या ह्रदयावर घाव होत होते, व्यतित झाले होते.. स्वप्न भंग झाल्यासारख वाटत होत त्या लोकांना.
तर दुसरीकड याच्या उलट.. "बेटा, मन में लड्डु फुटा" वाली फिलींग होती.
त्यानंतर जेंव्हा कधी मुख्यमंत्री गावच्या दौ-यावर यायचे किंवा एखादे वेळेस गावातून गेले तरी.. गावातील काही अतिउत्साहित उन्नाड पोट्टे, भावजी दिसले कि, "भावजी.. भावजी.." करायचे.!!
मग, गावच्या ताई ओळख करुन देत असत तर एखाद्याची कामानिमीत्त शिफारस करत. पुन्हा गावच्या हस-या खेळत्या वातावरणात अजून रंगरंगोटी व्हायची.
हं.!! अजून एक आठवल.. जेव्हा एकोपा वाढवण्यासाठी काय कराव लागेल या विषयावर चर्चा रंगली तेव्हा त्यात खुप छान अण् दखल घेण्यास लावणारे अभिप्राय येत होते.
"संवाद" पाहिजे असं कोणीतरी सांगितल.. मग त्यासाठी काय तर, "जो पर्यंत एका ताटात, एका डब्यात खाणार नाही.. चटणी-भाकरीची देवान घेवान होणार नाही,.. तो पर्यंत संवाद होणार नाही.. एकोपा वाढणार नाहीच.!!"
याचा परिणाम म्हणून कि काय, लगेच दूस-या दिवसापासून एकमेकांना जेवायल बोलवन. चहा पाणी. इकडचे तिकड.. तिकडचे इकड.. डब्यांची लेण देण सुरु झाली.
एकंदरीत काय तर गुण्या गोविंदाणे नांदणा-या गावात 'गोविंद' आणखीच नवचैतण्याचा वर्षाव करत होता. सगळ्या गोपिका आनंदात बागडत होत्या.. ते गाव म्हणजे साक्षात श्री क्रष्णाची मथुराच झाल्यासारख वाटत होते.
पुढील टप्यात गावातील बेरोजगारांसाठी, नोकरीच्या शोधार्थ असलेल्या तरुनांच्या मदतीसंदर्भात एक समिति गठित करण्यात आली, त्यामध्ये प्रसिद्ध, प्रतिष्ठित, दांडगा जनसंपर्क असणा-या व्यक्तिंची नेमणूक करण्यात आली.
त्या समिति च काम म्हणजे, तरुण-तरुणींस हव्या त्या ठिकाणी नोकरीसंदर्भात 'सेटिंग' लावण्यास मदत करणे व योग्य ती माहिती पुरविणे. ती समिति तत्कालीन TPO या नावाने ओळखल्या जाऊ लागली. समिति अंतर्गत विविध कामे होऊ लागले जसे कि,
"कंपनी ची योग्य ती माहिती, रिकामी जागा आहे का, भेटी ठरवणे, फोटो, पत्ता वगैरे.. " अशा पद्धतिने माहितीणे उमेदवारास योग्य मदत होत असे.
सर्वजण खुश होत आणि गावकरी मनोमन धन्यवाद देऊ लागले.!!
या सर्व आनंदी वातावरणात मग गावाचे नामकरण करण्यात आलं, "UTM" (United TE Mech.)
आनंदी वातावरणामुळे गावच्या शिरपेचात बरेच मान सन्मान मिळत गेले.
कला, क्रिडा, सांस्कृतिक, तांत्रिक, सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रात गावाचा झेंडा राज्यभर डौलाणे फडकु लागला.
हे सर्व एकीतून, सामंजस्यातून होऊ लागले.
सर्व गांव आनंद साजरा करत असे.
गावाची शान इतकी वाढली होती कि, त्यांनी दुस-या देशांत, राज्यात देखील पराक्रम गाजवले होते.
चेन्नई, दिल्ली, गोवा, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, अशा कित्येक परकिय देशात गावक-यांनी झेंडे गाडून. अटकेपार विजयाची आणि सन्मानाची गुढी उभारली.!!
कालांतराने का कुणास ठाऊक, त्या गावाला कोणाची नजर लागली. लहान लहान गोष्टीवर वाद होत गेले.. बोलणं कमी झाले.. एकत्र येऊ लागले पण, मोकळे वाटेणात. गावातील गावातच कोणी कोणाच्या 'नाकावर टिच्चुन', तर कधी.. 'आले त्यांच्या सोबत नाही त्यांच्या शिवाय.' अशा पद्धतित बोलायला लागले, एकमेकांना हिणवाय लागले. नंतर 'स्टेटस वार' झाले.. गावकरी डायरेक्ट घरावर पाट्या लावाय लागले.. घरातले भांडण दारात येऊ लागले.. आजु बाजुचे त्यात आणखी तेल टाकायच काम करायचे तर काही नुसती बघ्यांची भुमिका.
मन फाटत गेले.. विचार तुटत गेले.. पाखरे उडायला लागली. समोर आले तर चेह-यावर खोट हसु ठेवत खुश करने हा एकमेव कार्यक्रम सुरु झाला.
सगळा चकनाचूर झाला गावच्या एकीचा.. स्वप्नांचा.. विचारांचा.. प्रतिष्ठेचा.!!
गाव मोठं होत गेल.. गावकरी मोठी होत गेली.. नोक-या भेटल्या छोक-या भेटल्या.. पण, डोकी लहाण होत गेली. त्यात स्वाभिमान, स्वार्थ, मोठेपणा, मीपणा, स्वप्रतिष्ठा, ईष्र्या, शिरत होती. कोणी कोणास काही बोलले, म्हणले तर राग येऊ लागला.. Ego Hurt होऊ लागले.
कोणी सरपंच झाले, कोणी आमदार खासदार झाले, कोणी शाखाप्रमुख तर कोणी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष. तर काही शासकिय अधिकारी झाले.
हळु-हळु त्या गावात वेगवेगळ्या संघटना स्थापन होत गेल्या,
फक्त १५, पंचतारिका, फ्रेंड्स फोरेव्हर, पट्टी, फाटक भक्त (GATE Aspirants ), मांजर भक्त (CAT Aspirants), बाजा पथक, घेण न देण संघटना, अशा विविध संघटनेच्या गावात चौका चौकात पाट्या लागल्या.
मग त्या संघटनांच्या अंतर्गत जो तो वेगवेगळे उपक्रम हाती घेऊ लागला, विविध माध्यमातून प्रतिष्ठा जपण्याची आणि मोठेपणा दाखवण्याची स्पर्धा सुरु झाली. खटके उडत गेले. काट्यान काटा काढायचा, सापळे रचायचे, खाली ओढायच, जिरवा जिरवी, असं करत खेकडे होत गेले.
अशा स्थितीत आज गाव आहे.
त्या व्यासपीठावर आजही कार्यक्रम होतात ते देखील संघटणे अंतर्गतच, सण होतात, शुभेच्छांचा वर्षाव होतो, ठेंगे येतात, कधी कधी तर तिथे रेल्वे येतात रेल्वे स्टेशन च स्वरुप येत, जन्मदिवस देखील साजरे होतात, सत्कार होतो, सन्मान दिला जातो.
हे कमी म्हणून आज बाजारात आलेल्या त्या ढोरं हाकायच्या Hike वर अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून डोळ्यासमोर येण्याचा तिथ नविन खेळ सुरु झाला आहे.
त्या Hike ने तर आवड नावड दाखवण्याचा पर्याय देऊन आणखी update केल.
पण, ती UTM ची आपुलकी, प्रेम, आत्मीयता, माया ममता, करुणा, उत्साह, जोश, तो धिंगाणा ती मस्ती, ती थट्टा, चेष्टा, ती एकता कधीच दिसत नाही.. जाणवत नाही.. भासत नाही. व्यासपीठावर जाव अस देखील वाटत नाही.
मन मरतय.. श्वास कोंडतोय.. या ONLINE च्या तापामुळे.
-##-
------------------------------------------------------------
२०१५ ने हसवलं आणि रडवलं देखील.
२०१६ साठी शुभेच्छा, UTM चे दिवसं येवोत हीच प्रार्थना...
----------------------------------------------------------- थांबतो..!!
> आमच्या नांदेडचा डायलॉग आहेच कि 'भंड करु नको, लक्षात ठेव जास्त मीठ झालं कि भाजी खरट होते."
-##-
मेकैनिकल: - मेक व कला यांच्या अंतःकरणातून निघालेल्या शब्दांचा हा प्रपंच.
@औरंगाबाद इंजीनियरिंग साठी.
जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र.
जय जिजाऊ.!!
जय शिवराय.!!
जय शंभुराय.!!
यंत्र अभियांत्रिकीच्यांना,
जय.. जय.. मशिन.! ;-)
धन्यवाद!!
---------------------------------------------------------------
दिनांक: २८/१२/२०१५. वेळ: ५:४८.(सायं).
---------------------------------------------------------------
Adkine saheb ek number👌👌😢😢
ReplyDelete