दिवाळी २०१६!!
दिवाळी जटाशंकरासोबत. नमस्कार!! स्वयंभु जटाशंकरा.. दिवाळी निमीत्त थोड काही बोलाव म्हणतोय आपल्या सोबत.. कसय बगा, मागच्या वर्षी दुष्काळात तुमची लय आठवन असायची. जास्त काही काम नव्हते म्हणून वेळ द्यायला जमायचा.. यंदा.. तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या प्रार्थनेने इंद्रदेव प्रसन्न झालेत आणि त्यांच्या क्रुपेने चांगला पाणी पाऊस झाला.. सगळी कड कस एकदम प्रसन्न वातावरण आहे.. समद्या शेतक-यांची सुगी एकदम झ्याक आहे, सगळे खुश आहेत. हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे सगळे करते करविते विधाते तुम्हीच आहात.. आमच्या सारखे गाव सोडुण बाहेर राहणारे कित्येक जण दिवाळी निमीत्त घरी येतात, लहानपणीच्या मौज मस्तीच्या आठवणींची शिदोरी तुमच्या टोलेदार मंदिरात सगळे जण वाटून खातात. पुन्हा एकदा लहान होतो आम्ही दर दिवाळी ला.. हे माझ लेखणीतून तुमच्यासोबत बोलणे म्हणजे kind of appreciation हो. बाकी काही नाही.. यावेळेसची सुगी पाहुन सर्व आनंदात आहेत या सुगी वर कोणाची नजर पडु देऊ नका ही एवढी विनंती. जसा तापत्या रानात.. आणि भिजत्या पावसात.. शेतक-याणे, कष्टक-याणे घाम गाळलाय ना तसा दाम भेटेल याची जरा.. काळजी घ्या हीच...