यांची इतिहासाला व भविष्याला दखल घ्यावी लागणार..(25/6/17)

*बिगुल वाजला.* अभियांत्रिकी महाविद्यलय औरंगाबादने विविध कला, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, या सगळ्याच क्षेत्रात आम्ही (जिकाचे विद्यार्थी) काय आहोत.?? हे काल औरंगाबादकरांना दर्शन दिले... तब्बल 5 तास रसिकांना हरवुन टाकले.. विसरायला लावले आपण कोण आहोत.. बघा, हसा.. रडा.. भावनिक व्हा आणि मधूनच शिट्ट्या येऊ द्या.. अरे बाप.. आय शपथ.. खरच.. कडक.. जिंकल.. आखरी.. अप्रतिम.. कोण आहे राव हे.. त्याला पकडा.. काय चित्र.. आवाज.. सुर.. याच शब्दांचा जप काल यशवंतराव चव्हान नाट्यगृहातील रसिकांना करावा लागला.. आणि तो जप घडवून आणला.. *भावी अभियंत्यांनी!!* आणि हे घडण्यामागे निमित्त होते.. *नाटक 2.0*. कित्येक वर्षापासूनचे *अभियंत्याच हे स्वप्न..* कि रंगमंच गाजवायचा.. मन जिंकायची.. रसिकांच दुःख, त्रास, अडचणी तेवढ्या काळासाठी दूर करायच्या.. त्यांच्या मनात शिरायच.. वेगळ्या दुनियेत न्यायच.. आणि कायमस्वरुपी त्यांना जिंकायच.. हेच *ते स्वप्न*.. प्रत्येक्षात आणलेच सोबत.. *मराठवाड्याचा, औरंगाबादचा, आणि आमच्या जिकाचा रंगमंचावरचा पाया मजबुत केला.* सर्व प्रकारच्या कला क्षेत्रात आम्ही येणार आहोत.. ...