शिवजयंती - २०१९.

"शिवजयंती आणि परमनंट चे विचार." शिवबा, शिवाजी, शिवराय, शिवाजी महाराज, राजे, छत्रपति, जाणता राजा अशी कितीतरी नावे एका मानवाने एका आयुष्यात कमावलीत. शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे.?? कदाचित शेक्सपियर यांनी "शिवाजी" या नावाचा अभ्यास केला नसावा, म्हणून तो प्रश्न त्यांना असेल. भारतात, महाराष्ट्रात आल्यानंतर कळतं कि, "शिवाजी" या नावाचे "चलन" काय आहे.?? काय काय कारनामे ह्या नावाच्या साहाय्याने होऊ शकतात हे कळते. तसे शिवाजी महाराजांचे आपल्याला माहिती असलेले कार्ये खुप मोठे आहेत. ३५० वर्षापासून आपण फक्त मोजक्याच कामाचा उदो उदो करतो आणि महात्म्य गातो, मोजकेच पराक्रम गात बसतो. शिवाजी महाराजांचा एक फतवा (कायदा/आदेश) होता.. "सर्वांस पोटास लावणे आहे. " हे तसे चार शब्द पण अर्थ आणि काम अजूनही चालूच आहे. ययातून शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्यकारभार, काळजी, जिम्मेदारी हे सर्व दृष्टीकोन आपल्या लक्षात येतात. त्या कायद्यातून शिवरायांना अभिप्रेत होते,.. "सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, काम, सुरक्षा आणि शांति." हा कायदा...