Engineering.

आजची आमची इंजीनियरिंग. न कळत कुठुन हा प्रवास सुरु झाला.. वाचत, लिहीत, ऐकत, पुस्तकांना समजुन घेत कधी आम्ही. किती विषयात शिरलोत आणि त्यातून खूप काही शिकलो.. समजल सुद्धा नाही. काय, किती शिकलोत याची उजळणी करताना त्या सुरुवातीच्या शूण्यापासुन सुरु केलेला हा प्रवास आठवला आणि आता कुठे आहोत. याचा जेंव्हा विचार करतो तेंव्हा खूप लांब चा पल्ला गाठला अस लक्षात येते. या प्रवासात खूप धक्के खालेत.. बसलेत.. Stop मिळालेत.. शिक्षकरुपी, मित्ररुपी, मेस वाल्या काकांपासुन ते घर मालक, Seniors, Juniors.. असा विचार केला तर साधारण 5 इंजीनियरिंगच्या पिढ्यांना भेटण्याचा योग येतो याच प्रवासात. तरी, Events, Social media, आण guest रुपी मिळणारे प्रवासी. तर वेगळेच..!! कित्येक प्रवासी मिळाले.. त्याच प्रवांशामुळेच हा प्रवास सुखद वाटतो. आपली इंजीनियरिंग.. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणारी.. मनात अण् डोक्यात काही दाबून ठेवणारी नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आनंद घेते, त्रास देते, बोलते.. हसती-खेळती खोडकर इंजीनियरिंग आहे....