हरवलेली पाने.

पुन्हा एकदा अहमदपुरच्या आठवणीत... ✒ दिवाळी झाल की गावाकडुन अहमदपुर ला जातानाची same feeling. Experienced. ✒ परीक्षेचा अभ्यास करताना, गाव अन् घरचेच दिसायचे. Same होत आहे आजसुद्धा. ✒ फरालाच घेवून नेलेल ते टिकवून आणि वाटुन खातानाची मजा. आजही विसरता येत नाही. ✒ नव नविन कपडे दाखवुन, आपली दिवाळी किती मस्त झाली हे सांगतानाचा अनुभव. ✒ वडवणीच्या मुलांनी आनलेला ढोले अन् माऊली चिवडा. ✒ सकाळच्या नाष्टा, जेवताना तुप आणि चटणी असलेला मुलगा प्रत्येकाचा दोस्त व्हायचा. ✒ ती दर गुरुवारची साई बाबा आरती अन् मग साखर मिक्स नारळ खाताना यायची ती मजा! ✒ स्वयंपाकासाठी आनलेल जाळतन (धिपल्या) वर नेताना, अन् ते काम चोरपना आजही एकदम ताजा वाटतो. ✒ एकजन बाहेरुन येवून " चल लगवी " ला म्हनल्यावर.. बाहेर एका रांगेत सगळेच. ✒ अभ्यास करताना त्या डुलक्या. ✒ आपल्या पेटीसमोर ते सतरंजी टाकुन झोपन. अजुन भरपुर आठवणी आहेत.. ज्या आजुन आपल्याला शिकवतात... "सर, पुस्तक काढलं कि गाव अन् घरच दिसायल हो!!" हा अजरामर dialogue ज्या कोणी वापरला त्यासाठी ही post... #engineering exam चा अभ्यास करताना अहमदपुरची आठवण ...