जटाशंकरा. बोल रे...
देवा.. देवा जटाशंकरा.. तुला बोलायचं रे मला.. विचारायचंय तुला खुप काही.. बोल तु.. एवढा कठोर का झाला..?? तुला काय म्हणाव कळत नाही.. कठोर म्हणावं की मायाळु..?? भोळा तर आहेच तु.. भोळा शंकर म्हणून सगळ्या जगात तुझी ओळख आहे..!! सांग ना काय खेळ सुरु केला आहे तु हा.. मागच्या ५-६ वर्षापासून बघायल गांव अण् तुझे भक्त.. महाशिवरात्रीच्या काळातच कोणाला तरी तु घेऊन जात आहे.. काहीतरी कोणीतरी पाहिजे तुला.. दरवर्षीच का..?? बस्स कर ना आता.!! बोल काय पाहिजे तुला.. तुला तर माहित आहे आपलं गाव अन् गावकरी किती श्रीमंत आहेत.. पंचक्रोशीत प्रसिद्ध अण् सधन गाव आहे.. गावकरी तुझा शब्द खाली पडु देणार नाहीत.. तु फक्त बोल काय अण् किती पाहिजे..?? बघतो ना तु.. किती बागायतदार अण् मोठे लोकं आहेत गावात.. माहीत नाही का तुला.. लेकीवर किती प्रेम करतात.. लाड करतात.. गावचे सगळे जावई सुद्धा श्रीमंत, बागायतदार, नोकरदार, आणि उच्चशिक्षित अधिकारीच आहेत.. लग्नाच्या वेळेस.. कसा पैश्याचा.. खाण्या पिण्याचा पाऊस असतो कि तुझ्याच घरात.. तुझ घर लहाण पडु लागल तर दारात सुद्धा.. लेकिच्या सुखासाठी किती पुर आणतात म...